Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: चमत्कार म्हणावा की…! दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू पण श्रीमद्भगवद्गीता जशीच्या तशीच; पहा Video

काल म्हणजे 12 जून रोजी अहमदाबादमध्ये मेघानीनगर येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळले. या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 13, 2025 | 04:19 PM
Ahmedabad Plane Crash: चमत्कार म्हणावा की…! दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू पण श्रीमद्भगवद्गीता जशीच्या तशीच; पहा Video
Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद: काल अहमदाबादच्या मेघानीनगर येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास सुरू झाला आहे. तपासातून हा अपघात कशामुळे झाला याचा उलगडा होणार आहे. दरम्यान 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. मात्र सुदैवाने एकच प्रवासी यातून सुखरूप बचावला आहे. त्याचसोबत आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ श्रीमद्भगवद्गीते संदर्भात आहे.

अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण व्हिडिओ समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ श्रीमद्भगवद्गीतेशी  सबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

विमान अपघातामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघाताच्या ठिकाणी श्रीमद्भगवद्गीता सापडली आहे. त्याचा देखील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओचे विशेष असे म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेचे एकही पान त्यात खराब झालेले किंवा जळलेले नाहीये. हा व्हिडिओ पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे हा चमत्कार म्हणावा की अजून काही अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.

विमान में एक यात्री भागवत गीता लेकर सफर कर रहे थे भगवत गीता बिल्कुल सही सलामत प्लेन के मलबे में मिला है#AhmedabadPlaneCrash #Gujarat #GujaratPlaneCrash #AirIndiaPlaneCrash
#AirIndiaFlightCrash
Managed By – Team pic.twitter.com/Jo0iW352jy — Manish Kasyap Son Of Bihar (@ManishKasyapsob) June 13, 2025

काल म्हणजे 12 जून रोजी अहमदाबादमध्ये मेघानीनगर येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळले. या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. मात्र या विमानाच्या ढीगाऱ्यात श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ सापडला आहे. विशेष म्हणजे जशीच्या तशी राहिल्याचे दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये एक माणूस श्रीमद्भगवद्गीतेची पाने दाखवत आहेत.  यामध्ये  श्रीमद्भगवद्गीता जशीच्या तशी असल्याचे तो सांगत आहे. एवढा मोठा अपघात होऊनही श्रीमद्भगवद्गीतेचे एकही पान जळलेले नाहीये.

‘त्या’ १० मिनिटांमुळे सुखरूप, भूमीने सांगितली कहाणी

भूमी चौहान या अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमधून प्रवास करणार होत्या. मात्र त्यांना एअरपोर्टवर 10 मिनिटे उशीर झाला आणि त्या या मोठ्या घटनेतून सुखरूप वाचल्या आहेत. भूमी चौहान या एअर इंडियाच्या विमानातून अहमदाबादवरुण लंडनला जाणार होत्या. मात्र ती विमानाच्या वेळेत पोहोचू शकली नाही.

याबाबत भूमी चौहान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मला वाटेत ट्रॅफिक लागल्याने विमानतळावर पोचण्यास उशीर झाला. त्यामुळे मला विमानात चढू देण्यात आले नाही.” मात्र आता जीव वाचल्याने तिने देवाचे आभारच मानले आहेत. मी सुरक्षित आहे मात्र घडलेला अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे.

Ahmedabad Plane Crash: ‘जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,…’; ‘त्या’ १० मिनिटांमुळे सुखरूप, भूमीने सांगितली कहाणी

एअर इंडियाच्या अपघात झालेल्या AI 171 या विमानामधून विश्वास कुमार रमेश हे देखील प्रवास करत होते. ते विमानातील 11 A या जागेवर बसले होते. ३९ वर्षीय विश्वास रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. ते दीव येथे आपल्या भावासोबत आले होते. त्यांची पत्नी व मुलं लंडनमध्ये राहतात. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. मेघानीनगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्यांच्यापैकी २४१ प्रवासी आणि विमानातील सर्व क्रू मेंबर्स यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातातून फक्त विश्वास रमेश बचावले.

Web Title: Ahmedabad plane crash video viral of bhagavad gita find without burn accident gujarat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 04:19 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • Air India. Plane Crash
  • Bhagavad Gita
  • viral video

संबंधित बातम्या

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवातार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ
1

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवातार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral
2

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral
3

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

Lalit Modi: आधी भारताची थट्टा, आता माफीचा पाढा! परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘या’ पावलामुळे ललित मोदींनी भारताची मांगितली माफी
4

Lalit Modi: आधी भारताची थट्टा, आता माफीचा पाढा! परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘या’ पावलामुळे ललित मोदींनी भारताची मांगितली माफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.