Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India: एअर इंडियाच्या विमानाला हवेत जोरदार हादरे; हवेत ३०० फूट खाली गेलं विमान, १० प्रवासी, ४ क्रू सदस्य जखमी

Air India: थायलंडमधील फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 विमानाला उड्डाणादरम्यान तीव्र टर्ब्युलन्सचा फटका बसला. विमानाची उंची काही क्षणांत सुमारे ३०० फूट घसरल्याने १० प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्य जखमी झाले. विमानाने सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर लँडिंग केले असून घटनेची चौकशी सुरू करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 02:27 PM
एअर इंडियाच्या विमानाला हवेत जोरदार हादरे; हवेत ३०० फूट खाली गेलं विमान, १० प्रवासी, ४ क्रू सदस्य जखमी

एअर इंडियाच्या विमानाला हवेत जोरदार हादरे; हवेत ३०० फूट खाली गेलं विमान, १० प्रवासी, ४ क्रू सदस्य जखमी

Follow Us
Follow Us:
  • फुकेत-दिल्ली एअर इंडिया फ्लाइटमध्ये भीषण टर्ब्युलन्स
  • १० प्रवासी, ४ क्रू सदस्य जखमी
  • एअर इंडियाच्या AI2379 विमानात प्रवाशांमध्ये एकच खळबळ
 

Air India Flight: थायलंडमधील फुकेत येथून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 या विमानाला मंगळवारी (4 ऑगस्ट 2026) उड्डाणादरम्यान तीव्र टर्ब्युलन्सचा फटका बसला. या घटनेत विमानाची उंची काही क्षणांत सुमारे ३०० फूटांनी घसरली, त्यामुळे विमानातील प्रवासी आणि केबिन क्रूमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत १० प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्य जखमी झाल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.

एअर इंडियाच्या माहितीनुसार, VT-EXO नोंदणी असलेले हे विमान अचानक तीव्र टर्ब्युलन्स किंवा अपड्राफ्ट-डाउनड्राफ्टच्या प्रभावाखाली आले. त्यामुळे विमानाच्या उंचीत अचानक बदल झाला. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानावर तातडीने नियंत्रण मिळवले आणि उड्डाण सुरक्षितपणे दिल्लीकडे सुरू ठेवले.

Tejas mk1a ge f404 Engine: वायुसेनेसाठी आनंदाची बातमी! तेजस MK-1A साठी GE कडून इंजिन पुरवठ्याला वेग

अचानक बसलेल्या जोरदार धक्क्यांमुळे अनेक प्रवाशांचा तोल गेला. काही प्रवासी आणि केबिन क्रू यांना किरकोळ दुखापती झाल्या. विमान दिल्ली विमानतळावर उतरण्यापूर्वीच विमानतळ प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यामुळे वैद्यकीय पथक आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आधीच सज्ज ठेवण्यात आली होती. विमान सुरक्षितपणे उतरल्यावर सर्व जखमींची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले. एअर इंडियाने अधिकृत निवेदनात सांगितले की, प्रवाशांची सुरक्षितता ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता असून या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल.

एअर इंडियाने या घटनेवर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. एअरलाइनने असेही म्हटले आहे की, बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे आणि या घटनेच्या तपासात संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे.

टर्ब्युलन्स म्हणजे काय?

टर्ब्युलन्स म्हणजे उड्डाणादरम्यान वातावरणातील हवेचा दाब, वेग किंवा प्रवाह अचानक बदलल्याने विमानाला बसणारे जोरदार धक्के. अशा वेळी विमानाच्या उंचीतही अचानक बदल होऊ शकतो. त्यामुळे विमानप्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधून ठेवणे हा सर्वात सुरक्षित उपाय मानला जातो. अनेक विमान कंपन्या सीट बेल्टचा संकेत बंद झाल्यानंतरही बेल्ट बांधून ठेवण्याचा सल्ला देतात. सुदैवाने, वैमानिकाच्या तत्परतेमुळे विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरले आणि मोठा अपघात टळला. आता एअर इंडिया आणि संबंधित विमान वाहतूक प्राधिकरण या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करणार आहेत.

SITA ची आर्थिक कामगिरी मजबूत! 2050 पर्यंत 10 अब्ज प्रवाशांचे लक्ष्य, AI मुळे इंधन बचत आणि कमी प्रदूषण

Web Title: Air india phuket delhi flight hit by severe turbulence 14 injured plane drops 300 feet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • air india
  • airport
  • delhi

संबंधित बातम्या

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन
1

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.