
Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News
Ajit pawar Plane crash Death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुःखद मृत्यूमुळे देशात राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची चौकशी करण्याची मागणीही होत आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त करत केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर तीव्र हल्लाबोल केला आहे.
अजित पवारांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “हा केवळ अपघात असू शकत नाही. त्यामुळे या विमान अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी. आम्हाला कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणांवर विश्वास राहिलेला नाही. विद्यमान उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघातामुळे गंभीर प्रश्न निर्माण होतात. याचे सत्य बाहेर आले पाहिजे. अजित पवार महायुती आघाडी ( NDA) मध्ये नाराज होते, ते महायुती सोडणार होते आणि लवकरच एक मोठा राजकीय निर्णय घेणार होते,” अशीही चर्चा सुरू होती.
Ajit Pawar : “माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक
हुगळीतील सिंगूर येथे एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ” अजित पवार महायुतीत नाराज होते. अजित पवार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीपासून दूर जात आहेत. त्यांची शरद पवार यांच्याशी जवळीकता वाढत चालली असून ते इंडिया आघाडीत परतण्याची तयारी करत आहे.” अशी माहिती मला मिळाली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर, अनेक विरोधी नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्याच्या जाण्यामुळे राज्याच्या सत्तेच्या समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे आता या घटनेला कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या एक नवीन वळण मिळाले आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या अपघाताच्या चौकशीसाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे. तांत्रिक बिघाड की मानवी चूक, हे केवळ ‘ब्लॅक बॉक्स’चा अहवाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या विधानामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर राजकीय दबाव वाढला आहे.
बारामती विमानतळाची धावपट्टी सुरक्षित मानली जाते आणि अपघाताच्या वेळी हवामानही प्रतिकूल नव्हते. अशा परिस्थितीत, ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) सारख्या अत्यंत विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याने तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. ही घटना केवळ एक योगायोग आहे की एखाद्या मोठ्या कटाचा भाग, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.