Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निष्पक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘Eagle’ ची स्थापना; महाराष्ट्राच्या मतदार यादीतील फेरफार अन्…; कसे करणार काम?

Congress News: सध्या दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यातच लवकरच बिहारची निवडणूक देखील होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 02, 2025 | 07:20 PM
निष्पक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 'Eagle'ची स्थापना; महाराष्ट्राच्या मतदार यादीतील फेरफार अन्...; कसे करणार काम?

निष्पक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 'Eagle'ची स्थापना; महाराष्ट्राच्या मतदार यादीतील फेरफार अन्...; कसे करणार काम?

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: सध्या दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यातच लवकरच बिहारची निवडणूक देखील होणार आहे. दरम्यान देशात यापुढे होणाऱ्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने एक मोठे पाऊल उचलले आहे. देशातील निवडणुका भयमुक्त वातावरणात होण्यासाठी आणि निष्पक्ष होण्यासाठी कॉँग्रेसकडून ‘Egale’ टीमची स्थापना केली आहे. यात नियुक्ती करण्यात आले सदस्य हे प्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काम करत्नर आहे. ‘ईगल’चा अर्थ आणि यातील सदस्य कशाप्रकारे काम करणार हे जाणून घेऊयात.

कॉँग्रेसने ‘ईगल’ (Empowered Action Group of Leaders and Experts) टीमची स्थापना केली आहे. ही टीम निवडणूकनिहाय आलेले निकाल आणि मतदार यादी यांचे विश्लेषण करणार आहे. याबाबतचा एक अहवाल ही कमिटी हायकमांडकडे सादर करणार आहे. या टीमला पहिले काम हे महाराष्ट्रामधले देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीतील फेरफार याबद्दल कमिटी हायकमांडला रिपोर्ट सादर करणार आहेत.

याबाबत कॉँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी पत्रक काढले आहे. ईगल टीममध्ये 8 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये समावेश करण्यात आलेले सदस्य कोण आहेत. त्यांची नावे जाणून घेऊयात.

हेही वाचा: दारुण पराभवानंतर काँग्रेसची निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती; ‘हे’ 10 रोखठोक सवाल केले उपस्थित

1. अजय माकन
2. दीग्विजय सिंह
3. अभिषेक सिंघवी
4. प्रवीण चक्रवर्ती
5. पवन खेडा
6. गुरदीप सप्पल
7. नितीन राऊत
8. चल्ला रेड्डी

मतदारांची संख्या 50  लाखांनी कशी वाढली?

नाना पटोले म्हणाले की, दिल्लीतील काही काँग्रेस नेते २५ जानेवारी रोजी महाराष्ट्रात येऊन माध्यमांशी संवाद साधतील. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या 6  महिन्यांत मतदारांची संख्या 50  लाखांनी कशी वाढली आणि मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर अचानक 76  लाख मते कशी वाढली? पारदर्शकतेच्या मागण्या असूनही, निवडणूक आयोगाने कोणताही डेटा प्रदान केला नाही. आता, सामान्य माणसाला मतदानाची माहिती देण्यास मनाई करणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) ला मोठा धक्का बसला, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उत्तर प्रदेश) ने 20  जागा जिंकल्या, काँग्रेसने 16  जागा जिंकल्या आणि शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) ने 16जागा जिंकल्या. फक्त 10  जागा मिळाल्या.

काँग्रेसची निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती

  • मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग दर दोन तासांनी जाहीर करत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा रिपोर्ट अर्धा तास उशीराने का येत होता?
  • संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२% मतदान आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६५.२% मतदान कसे झाले?
  • प्रत्येक व्यक्तीला मतदानासाठी साधारण एक मिनिटाचा कालावधी लागतो. याप्रमाणे मतदानाची अंतिम टक्केवारी आणि लागलेला वेळ यांची सांगड का बसत नाही?
  • रात्री उशीरापर्यंत झालेल्या मतदानाच्या रागांची छायाचित्रे आणि व्हिडिओ फूटेजेस निवडणूक आयोगाने का प्रसिद्ध केली नाहीत?
  • राज्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रांवर रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू होते?
  • मतदानाच्या दुस-या दिवशी म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी ६६.५% मतदान झाल्याची आकडेवारी कशाच्या आधारावर जाहीर करण्यात आली?
  • रात्री उशारापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी इतका वेळ का लागला?
  • २० नोव्हेबंर रोजी सायंकाळी ५८.२२% मतदान आणि २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६५.२% मतदान झाल्याच्या आकडेवारील ७.८३% वाढ कशी झाली याचा खुलासा का करण्यात आला नाही?
  • एकूण मतामध्ये ७६ लाख मतांची वाढ कशी झाली?
  • निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत का पोहचवली नाही?
 

Web Title: All india congress create eagle team for maharashtra election voters list and manipulation for fair election in india latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • Congress
  • Election Comission
  • K. C. Venugopal
  • Maharashtra Election

संबंधित बातम्या

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला
1

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला

Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance: मोठी बातमी! महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा
2

Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance: मोठी बातमी! महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

भाजपाच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान; हर्षवर्धन सपकाळांची टीका
3

भाजपाच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान; हर्षवर्धन सपकाळांची टीका

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार घोषित; कोणाला संधी?
4

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार घोषित; कोणाला संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.