Photo : Arvind Kejriwal
नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्यापही दिलासा मिळत नाही. ‘केजरीवाल यांची अटक कायदेशीर आहे. सीबीआयने त्यांना कोणतेही कारण नसताना अटक केली असे म्हणता येणार नाही. ईडीच्या ताब्यात असताना केजरीवाल यांना 26 जून रोजी सीबीआयने अटक केली होती’, असे सांगत कोर्टाने त्यांची जामीन याचिका फेटाळून लावली.
सीबीआयच्या खटल्यातील त्यांच्या अटकेविरोधात आणि याच प्रकरणात जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावल्या. पण, न्यायालयाने त्यांना ट्रायल कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी सांगितले की, केजरीवाल यांची अटक कायदेशीर आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! आम आदमी पक्ष मुंबईतील सर्वच्या सर्व जागा लढवणार; निवडणुकीत येणार रंगत…
सीबीआयने त्यांना कोणतेही कारण नसताना अटक केली असे म्हणता येणार नाही. ईडीच्या ताब्यात असताना केजरीवाल यांना 26 जून रोजी सीबीआयने अटक केली होती. मात्र, मनी लॉड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
हेदेखील वाचा : धावणे की सायकलिंग? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर काय? पाहा स्नायू कोणत्या व्यायामाने होतील मजबूत
दरम्यान, केजरीवाल यांनी सीबीआय प्रकरणात अटक करून रिमांडवर पाठवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. ईडी आणि सीबीआयने केजरीवाल हे मद्य घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. पण, आम आदमी पक्ष हे आरोप फेटाळून लावत आहे.