सायकल चालवल्याने आरोग्याला होणारे फायदे
ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी काम करत तासनतास बसून राहिल्यास हळूहळू वजन वाढू लागते. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. सतत एका जागेवर बसून काम केल्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. शरीराची हालचाल कमी झाल्यानंतर हाडे दुखणे, स्नायू दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे फिजिकल अॅक्टिव्हिटी राहणे फार गरजेचे आहे. फिजिकल अॅक्टिव्हिट राहिल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवत नाहीत. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी जिमसोबतच सायकल चालवणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. सायकल चालवणे हा सुद्धा एक व्यायाम प्रकार आहे. नियमित 10 ते 15 मिनिटं सायकल चालवल्यास शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला सायकल चालवल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित 15 ते 20 मिनिटं सायकल चालवावी. सायकल चालवल्यामुळे मन शांत होऊन ताणतणाव कमी होण्यास मदत होते. सायकलिंग करणे हा व्यायाम प्रकार असून नियमित केल्यास आरोग्याला फायदे होतील. सायकल चालवल्यामुळे तुमचा मूड सुधारून आरोग्यसुद्धा चांगले राहील.
हे देखील वाचा: मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांचे सेवन करता! तर वेळीच थांबा, जाणून घ्या आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक तासनतास जिम करतात. पण असे करण्याऐवजी नियमित २० मिनिटं सायकल चालवावी. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह इत्यादी आजार कमी होतील. सायकल चालवताना शरीर कॅलरी बर्न करतात, यामुळे शरीरात जमा झालेले अतिरिक फॅट कमी होऊन वजन कमी होण्यास सुरुवात होते.
सायकल चालवल्याने आरोग्याला होणारे फायदे
नियमित सायकल चालवल्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. पायांच्या व्यायाम करण्याऐवजी रोज सायकल चालवावी. यामुळे पायांची हाडे मजबूत होतात.
नियमित सायकल चालवल्यामुळे रक्तवाहिन्यांमधील प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी सायकल चालवणे आवश्यक आहे. सायकल चालवल्यामुळे रक्तदाब सुधारतो आणि रक्तभिसरण सुरळीत होते. हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी नियमित सायकल चालवावी.
हे देखील वाचा: स्वयंपाक घरातील ‘हे’ मसाले जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी आहेत फायदेशीर
अनेकदा जिममध्ये जाऊन अतिप्रमाणात व्यायाम केल्यामुळे सांध्यांवर ताण येण्यास सुरुवात होते. तसेच गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर गुडघ्याला इजा होण्याची शकता असते. त्यामुळे सायकल चालवावी. सायकल चालवल्यामुळे सांध्यांवर ताण पडत नाही.