Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Atiq Ahmed: एकामागोमाग एक संकटे; माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?

Atiq Ahmed: प्रयागराजहून झाशी कारागृहात मोठ्या भावाला भेटण्यासाठी निघालेल्या माफिया डॉन अतीक अहमदच्या धाकट्या मुलगा आबान अहमदचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. झाशीतील पूंछ परिसरात कार डिव्हायडरला धडकल्याने आबानसह दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2026 | 02:50 PM
एकामागोमाग एक संकटे; माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?

एकामागोमाग एक संकटे; माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?

Follow Us
Follow Us:
  • अतीक अहमदचा धाकटा मुलगा आबानचा झाशीत रस्ता अपघातात मृत्यू
  • झाशीतील भीषण अपघातात अतीक अहमदच्या धाकट्या मुलाचा मृत्यू
  • माफिया डॉन अतीक अहमदच्या कुटुंबावर आणखी एक आघात
Atiq Ahmed News Marathi: उत्तर प्रदेशातील झाशी येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा आबान अहमद याचा मृत्यू झाला. या अपघातात आबानसह त्याचा मित्र सोनू याचाही मृत्यू झाला असून अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण प्रयागराजहून झाशी कारागृहात बंद असलेल्या आबानच्या मोठ्या भावाला अली अहमद याला भेटण्यासाठी जात होते. ही दुर्घटना झाशी जिल्ह्यातील पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर घडली. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगातील कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आबान अहमद आणि त्याचा मित्र सोनू यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक तपासात चालकाला पहाटेच्या वेळी झोपेची डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. झाशीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) यांनीही कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले असून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

Bharatpol Digital Platform: ‘भारतपोल’ प्लॅटफॉर्मने बदलला तपासाचा चेहरा; ७ वर्षांत ३६ देशांतून २७४ गुन्हेगारांना आणले भारतात!

उल्लेखनीय म्हणजे, आबानचा मोठा भाऊ अली अहमद याला १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रयागराजच्या नैनी कारागृहातून झाशी कारागृहात हलविण्यात आले होते. त्याला भेटण्यासाठी जात असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला. एकेकाळी उत्तर प्रदेशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अतीक अहमदच्या कुटुंबावर गेल्या काही वर्षांत एकामागोमाग एक संकटे कोसळली आहेत. अतीक अहमद आणि त्याची पत्नी शाइस्ता परवीन यांना पाच मुले होती. त्यापैकी आता दोन मुलांचा मृत्यू झाला असून दोन मुले कारागृहात आहेत. कुटुंबातील काही सदस्य अद्याप फरार असल्याने अतीक अहमदचे कुटुंब पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र समोर आले आहे.

वयाच्या १७ व्या वर्षी खून आणि गुन्हेगारीच्या जगात प्रवेश

अतीक अहमदचे वडील, हाजी फिरोज, अलाहाबादमध्ये घोडागाडी चालवत असत. अतीक अभ्यासात कच्चा होता आणि लवकरच त्याने शाळा सोडली. श्रीमंत होण्याच्या ध्येयाने त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. १९७९ मध्ये, वयाच्या १७ व्या वर्षी, अतीकवर पहिल्यांदा खुनाचा आरोप ठेवण्यात आला. त्यावेळी अलाहाबादमध्ये ‘चांद बाबा’ नावाच्या गुंडाला अतीकची दहशत होती. चांद बाबामुळे पोलीस आणि राजकारण्यांना त्रास होत होता. अतीकने या संधीचा फायदा घेतला आणि पोलीस व राजकारण्यांच्या पाठिंब्याने चांद बाबाचा खून केला. यानंतर, अतीक अहमद रातोरात अलाहाबादचा नवा ‘डॉन’ बनला.

भारतीय डेटा सेंटर्सना मोठा दिलासा; परदेशी कंपन्यांसाठी अनुपालन प्रक्रिया होणार अधिक सोपी

Web Title: Atiq ahmed younger son abaan killed in jhansi road accident while going to meet brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Accident
  • atiq ahmed
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
1

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
2

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
3

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.