Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीकाकार असल्याने उमेदवारीची ऑफर, पण मला या फंदात पडायचंच नाही; प्रकाश राज यांचा निवडणूक लढवण्यास नकार

लोकसभा निवडणुकीत मला उमेदवार बनवण्यासाठी तीन राजकीय पक्ष माझ्यामागे लागले आहेत. परंतु, ते माझ्या विचारसरणीमुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा टीकाकार असल्यामुळे माझा वापर राजकारणात करू इच्छित आहे, असा दावा अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 15, 2024 | 11:02 AM
टीकाकार असल्याने उमेदवारीची ऑफर, पण मला या फंदात पडायचंच नाही; प्रकाश राज यांचा निवडणूक लढवण्यास नकार
Follow Us
Follow Us:

कोझिकोड : लोकसभा निवडणुकीत मला उमेदवार बनवण्यासाठी तीन राजकीय पक्ष माझ्यामागे लागले आहेत. परंतु, ते माझ्या विचारसरणीमुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा टीकाकार असल्यामुळे माझा वापर राजकारणात करू इच्छित आहे, असा दावा अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी केला. मात्र, मला या फंदात पडायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केरळ येथे आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये (केएलफ) ते बोलत होते. पुरस्कार विजेत्या प्रकाश राज यांनी कांचीवरम, सिंघम आणि वॉन्टेडसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमधील दमदार भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बंगळुरू सेंट्रलमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. परंतु त्यांना यश आले नाही.

विरोधकांचा आवाज कमी झाला

अभिनेता प्रकाश राज पुढे म्हणाले, आज देशातील सत्ताधाऱ्यांपुढे विरोधी पक्षांचा आवाज कमी झाला आहे. त्यामुळेच अनेक विरोधी पक्ष उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे. राजकारणात सत्याचा आवाज दाबला जात असल्यामुळे आज राजकीय पक्षांना उमेदवार मिळत नाही, ही शोकांतिका आहे. दरम्यान, अंजना शंकर यांनी प्रकाश राज यांना विचारले तुम्ही मोदींचा द्वेष का करता, यावर ते म्हणाले, मी त्यांचा द्वेष करत नाही. ते काही माझे सासरे नाहीत. ना माझा त्यांच्याशी मालमत्तेचा वाद आहे. मी फक्त करदाता आहे.

मी लोकांच्या मनातील बोलतो

एक्सवर सरकारवर टीका करणाऱ्या आपल्या पोस्टचा बचाव करताना प्रकाश राज म्हणाले, मी तेच बोलतो जे प्रत्येकाच्या मनात आहे. हा माझा आवाज नाही, हा लोकांचा आवाज आहे. ही माझी ‘मन की बात’ नाही तर आमची ‘मन की बात’ आहे. सतेत असलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. मी त्यांना मत दिले की नाही, हा प्रश्नच नाही. ते आमचे पंतप्रधान आहेत. आपण लोकशाहीत राहतो. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारू नका, असे म्हणता येत नाही. आज ते पदावर आहे म्हणून त्यांना बोलतो, उद्या दुसरे कोणी या पदावर आले तर त्यांनाही बोलेल, असेही ते म्हणाले.

Web Title: Being a critic of modi government so that candidacy offered says actor prakash raj nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2024 | 11:02 AM

Topics:  

  • entertainment
  • india
  • loksabha election 2024
  • political news

संबंधित बातम्या

PM मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, लवकर होणार कॅबिनेटमध्ये फेरबदल? हालचालींना वेग
1

PM मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, लवकर होणार कॅबिनेटमध्ये फेरबदल? हालचालींना वेग

खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी
2

खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

राज्यसभेतही वाढली NDA ची ताकद; निवडणूक न लढवताच ‘मॅजिक फिगर’च्या जवळ
3

राज्यसभेतही वाढली NDA ची ताकद; निवडणूक न लढवताच ‘मॅजिक फिगर’च्या जवळ

पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ‘तृणमूल’च्या अध्यक्षपदावरून ममता बॅनर्जींनाच हटवले
4

पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ‘तृणमूल’च्या अध्यक्षपदावरून ममता बॅनर्जींनाच हटवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.