File Photo : Congress
जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, राजसमंद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुदर्शन सिंह रावत यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. परदेश दौच्यावरून परतल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली.
रावत यांनी त्यांच्या जागी अन्य कोणाला तरी उमेदवारी द्यावी, अशी विनंती पक्षाकडे केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, या जागेसाठी उमेदवार शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.
काँग्रेस-भाजपात लढत
रावत यांनी 2018 मध्ये भीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यात विजयही मिळवला होता. सुदर्शन सिंह यांचे वडील लक्ष्मण सिंह हे माजी मंत्री असण्यासोबतच मागील अशोक गहलोत सरकारमध्ये मगरा विकास मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांचे आजोबा मेजर फतेह सिंग हेही आमदार राहिले आहेत. म्हणजे त्यांना राजकीय वारसा लाभला आहे.
आतापर्यंत झालेल्या 3 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने एकदा ही जागा काबीज केली आहे, तर भाजपने दोनदा ही जागा काबीज केली आहे. यावेळी भाजपने राजसमंदमधून महिमा विश्वेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली आहे.






