हिवाळा , ख्रिसमस, इअर ऐंडिंग म्हण्टलं की एकचं ट्रॅव्हल डेस्टीनेशन आठवतं, ते म्हणजे गोवा. ख्रिसमस आणि न्यू इअरच्या पार्श्वभुमिवर देशभरासह आंतराराष्ट्रीय पर्यटक देखील गोव्यात मोठी गर्दी करतात. यासाठी गोव्यातील विविध पर्यटक स्थळ, गोव्यातील बिचेस स्वच्छ ठेवणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने गोवा सरकारकडून विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. तरी या नव्या नियमांनुसार प्रशासनाकडून बिचवर बसून दारु पिण्यास आणि अन्न शिजवण्यास सख्त मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती गोवा पोलिसांकडून देण्यात आली आहे. गोव्यातील समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी हे नवे नियम लागू करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दिवाळीपासूनचं गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारी नंतर निर्बधांविना साजरा करता येणार हा पहिलाचं ख्रिसमस किंवा न्यू इयर असणार आहे. त्यामुळे स्वच्छेतच्या पार्श्वभुमिवर गोवा सरकारकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.