Stock Market Today: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता
Todays Gold-Silver Price: सोन्यानी पुन्हा घेतली नवीन झेप, 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये
शुक्रवारी, अमेरिका-इराण युद्धाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार झपाट्याने घसरला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,२०० च्या खाली बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ६५८.७० अंकांनी किंवा १.०८% ने घसरून ६०,५२९.०० वर बंद झाला. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, ऑइल इंडिया, बीईएल, भारती एअरटेल, टाटा मोटर्स पी.व्ही., अरबिंदो फार्मा, विशाल मेगा मार्ट, स्पाइसजेट, अदानी ग्रीन एनर्जी या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कोणते शेअर्स खरेदी करू शकतात, याबाबत देखील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
चॉइस ब्रोकिंगचे सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज व्यवहारात खरेदी करण्यासाठी आठ स्टॉकची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी इंट्राडे ट्रेडिंगसाठी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये साई लाइफ सायन्सेस, आरआर काबेल, बीईएल, सेल, एचएएल, ओआयएल, कल्पतरू प्रोजेक्ट्स आणि गोदरेज अॅग्रोव्हेट यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे.
Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…
सुमित बगडिया यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये प्रिसिजन वायर्स इंडिया, टीडी पॉवर सिस्टम्स, अपोलो पाईप्स, आयडीबीआय बँक आणि चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक सीमा श्रीवास्तव यांच्या मते, अमेरिका-इराण युद्धादरम्यान आज सोमवारी अदानी पोर्ट्स, सन फार्मास्युटिकल, एशियन पेंट्स आणि बर्जर पेंट्स, अपोलो टायर्स आणि बालकृष्ण इंडस्ट्रीज या शेअर्सवर फोकस असणार आहे.






