मीरा-भाईंदर शहरातील चर्चेचा विषय ठरलेल्या बॉटन लेक परिसरातील उड्डाणपुलाला युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘विश्वगुरू उड्डाणपूल’ असे नाव देत नव्या वादाला तोंड फोडले आहे. या नामकरणामुळे शहरात पुन्हा एकदा काँग्रेस-भाजपामध्ये राजकीय खडाजंगी रंगली आहे. सदर उड्डाणपूल उभारल्यानंतर त्याच्या रचनेवर आणि नियोजनावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पुलाच्या डिझाईनमुळे आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे शहरातील अभियांत्रिकी कामांची खिल्ली उडाल्याची चर्चा रंगली होती. काही व्हिडिओ आणि पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर या पुलाची चर्चा राज्यभरच नव्हे तर देशभरात झाली होती. याच पार्श्वभूमीवर युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकात्मक पद्धतीने या पुलावर ‘विश्वगुरू उड्डाणपूल’ असा फलक लावून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “ज्या पद्धतीने विकासकामांचा गाजावाजा केला जातो, त्याची ही वास्तवस्थिती आहे,” असा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला.