अररिया : सर्वच दाढीवाल्यांना दहशतवादी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सत्ताधारी समजायचे का? राजद, भाजपा नेते कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन सतत हल्लाबोल करत असतात. आता बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी (Samrat Chowdhary) यांनी राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी ओसामा बिन लादेनशी (Osama bin Laden) केली आहे. ते म्हणाले, राहुल गांधी ओसामा बिन लादेनसारखी दाढी वाढवून पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघतात. दाढी वाढवून ते विचार करत आहेत की, मोदींमाणे तेही पंतप्रधान होतील.
अररिया येथील तेरापंथ भवन येथे भाजपाच्या जनसंपर्क कार्यक्रमात सम्राट चौधरी म्हणाले, आम्ही राहुल गांधींना 50 वर्षांच्या मुलाप्रमाणे मानतो. 50 वर्षे वय असलेल्या आणि राजकीय बुद्धिमत्ता नसलेल्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो ? दुसऱ्या बाजूला त्यांची बहीण आहे, जी म्हणते की ती कधीही निवडणूक लढवणार नाही. आता यावरून त्यांच्यात वाद सुरू आहे.
सम्राट चौधरी यांच्या वक्तव्यानंतर राजद नेते मनोज झा यांचे वक्तव्य समोर आले आहे. या देशात कोट्यवधी लोक दाढी ठेवतात. दाढीमुळे सर्वांना दहशतवादी अथवा ओसामा बिन लादेन समजायचे का?, असा सवाल त्यांनी सम्राट चौधरी यांना केला आहे.
लव्ह जिहाद खपवून घेणार नाही
सम्राट चौधरी पुढे म्हणाले, एनडीएचे सरकार आल्यास सीमाचलमध्ये गायींची कतल करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. लव्ह जिहादचे नेटवर्क खपवून घेतले जाणार नाही. त्याचबरोबर भारताचे खाऊन जे पाकिस्तानचे गुणगान गातात, त्यांना त्यांनी इशारा दिला. अशा सर्वावर कारवाई केली जाईल. बांगलादेशी घुसखोरांवरही कडक कारवाई केली जाईल. मानसिक स्थिती ठीक नाही. त्यांची अवस्था गझनी चित्रपटातील आमिर खानच्या पात्रासारखी झाली आहे.