सोनिया गांधींचं पुस्तक फाडण्यावर आशिष शेलारांची नाराजी
आशिष शेलार यांनी शिवसेना शिंदे गटाने केलेल्या पुस्तक फाडण्याच्या कृतीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. पुस्तक फाडणं मला कधीच मान्य नाही, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली.
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॉ. विजय चोरमारे यांच्या ‘गाथा भारतीय निवडणुकांची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शेलार बोलत होते. यावेळी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी साहित्य आणि पुस्तकांच्या महत्त्वावर भाष्य केले.
Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!
यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, “पुस्तक फाडणं मला मान्य नाही. मी कधीच कुठलं पुस्तक फाडलेलं नाही. पुस्तक आणि साहित्यनिर्मिती समाजाला प्रगल्भ करत असते. एखाद्या पुस्तकातील विचारांशी सहमत नसाल किंवा त्यावर आक्षेप असतील, तर त्यावर मत मांडता येऊ शकतं; मात्र पुस्तक फाडणं योग्य नाही,” असं शेलार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, संजय निरुपम, शायना एनसी आणि आनंद दुबे यांनी पत्रकार परिषद घेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध केला होता. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी पुस्तकाची प्रतही फाडण्यात आली होती.
याच कार्यक्रमात शेलार यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेवरही भाष्य केलं. गेल्या ७५ वर्षांतील निवडणुकांचा आढावा घेण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आक्षेपार्ह घटना घडल्या असतानाही विरोधकांनी त्यावेळी आवाज उठवला नाही, असा सवाल त्यांनी केला.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पक्ष आणि खासदारांच्या संख्येसंदर्भातील मुद्द्याचा उल्लेख करत शेलार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचा संदर्भ दिला. इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न निर्माण झाला होता. मग तोच निकष सध्याच्या राजकीय परिस्थितीत का लागू होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पुस्तक फाडण्याच्या कृतीवर शेलार यांनी व्यक्त केलेली नाराजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Political News : ‘१५० कोटींचा भाव’ कसा सुरू होतो? संजय राऊतांच्या दाव्यावर प्रताप सरनाईकांचा घणाघात
Ans: शिंदेंच्या शिवसेनेने 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाल्याचा आरोप करत पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली आणि निषेध म्हणून पुस्तकाची प्रत फाडण्यात आली.
Ans: आशिष शेलार यांनी पुस्तक फाडण्याच्या कृतीला विरोध केला. पुस्तक आणि साहित्यनिर्मिती समाजाला प्रगल्भ करते. पुस्तकातील विचारांशी मतभेद असले तरी पुस्तक फाडणं योग्य नाही, असं ते म्हणाले.
Ans: देशातील गेल्या ७५ वर्षांतील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. पूर्वीच्या निवडणुकांवर आक्षेप असतानाही विरोधकांनी त्यावेळी आवाज उठवला नाही, अशी टीका त्यांनी केली.






