Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS BJP Leaders Fight: आरएसएस स्वयंसेवकाला भाजप नेत्याकडून बेदम मारहाण; मध्यप्रदेशात हायव्होल्टेज राडा

RSS BJP Leaders Fight: या घटनेनंतर चेतन पवार यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली, परंतु भाजप नेत्याच्या प्रभावामुळे त्यांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी आरएसएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 08, 2026 | 05:40 PM
Indore News, BJP RSS Clash, MadhyaPradesh Politics,

Indore News, BJP RSS Clash, MadhyaPradesh Politics,

Follow Us
Follow Us:

 

RSS BJP Leaders Fight: मध्य प्रदेशातील इंदूरच्या अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजप नेते आणि आरएसएस समर्थकांमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (६ जून) रात्री उशिरा एका कुत्र्याला खाऊ घालण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर एका गंभीर हाणामारीत झाले. ही हाणामारी भाजप नेते वीरेंद्र शेडगे आणि आरएसएस स्वयंसेवक चेतन पवार यांच्या झाल्याची माहिती आहे. भाजप नेते वीरेंद्र शेडगे यांच्या समर्थकांनी चेतनला मारहाण केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरएसएस नेते चेतन पवार हे भाजप नेते वीरेंद्र शेडगे यांच्या घराबाहेर भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत होते. आपल्या घरासमोर कुत्र्यांना खाऊ घालण्यास वीरेंद्र शेडगे यांनी आक्षेप घेतला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेदरम्यान वीरेंद्र शेडगे यांनी चेतन पवार यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

West Bengal Politics: तृणमूल काँग्रेसमध्ये भुकंप; दोन खासदारांचे राजीनामे, २० हून अधिक नॉट रिचेबल

पोलीस ठाण्यासमोरही आंदोलने

या घटनेनंतर चेतन पवार यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली, परंतु भाजप नेत्याच्या प्रभावामुळे त्यांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी आरएसएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. हे प्रकरण संघटनेपर्यंत पोहोचताच, मोठ्या संख्येने आरएसएस कार्यकर्ते सक्रिय झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. RSSच्या संतप्त कार्यकर्त्यांनी वीरेंद्र शेडगे यांच्या कार्यालयाची आणि घराची तोडफोड केल्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यानंतर, RSS कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि निष्पक्ष कारवाईच्या मागणी करत पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. वाढत्या दबावामुळे, चेतन पवार यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, वीरेंद्र शेडगे यापूर्वीही वादात सापडले. अलीकडेच, पोलीस अधिकाऱ्यांसोबतचा त्यांचा वादही चर्चेत होता.

India Alliance PC: शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि…; इंडिया आघाडीच्या बैठकीत ५ मु्द्द्यांवर चर्चा

भाजप नेत्यावर ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबनाची कारवाई

या प्रकरणानंतर सततच्या वादग्रस्त वर्तनामुळे आणि संघटनेच्या प्रतिमेला हानी पोहोचवणाऱ्या कारवायांमुळे भाजप शहर अध्यक्ष सुमित मिश्रा यांनी वीरेंद्र शेडगे यांच्यावर कारवाई करत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हल्ला, तोडफोड आणि इतर आरोपांची चौकशी केल्यानंतर तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

Web Title: Bjp leader and rss worker clash in indore over feeding stray dog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • BJP
  • Madhya Pradesh crime
  • national news
  • RSS

संबंधित बातम्या

Nagpur : हिमंता सरमा यांच्या मंत्राच्या मुलीचे बंड , मोदींविरोधात ओकले कटू शब्द
1

Nagpur : हिमंता सरमा यांच्या मंत्राच्या मुलीचे बंड , मोदींविरोधात ओकले कटू शब्द

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,
2

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान
3

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
4

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.