Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी; भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा

सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे ४९ टक्के फॉलोअर्स पाकिस्तानातील असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्याने केला आहे. त्यांनी इन्साइट डेटा शेअर करत याला पाकिस्तान जनता पार्टी म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 21, 2026 | 09:27 PM
Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी (Photo Credit- X)

Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • काय सांगता!
  • Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी
  • भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा
नवी दिल्ली: सोशल मीडियावरील एक उपरोधात्मक चळवळ म्हणून सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (Cockroach Janata Party) देशाच्या राजकीय पटलावर चर्चेत येण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. सुरुवातीला निव्वळ एक डिजिटल विनोद म्हणून पाहिली जाणारी ही ‘पार्टी’ आता थेट राजकीय नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य बनली आहे. काही विश्लेषक याला देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा संताप मानत आहेत, तर काहींनी याकडे एक नवा राजकीय पर्याय म्हणून पाहिले आहे. दरम्यान, या डिजिटल पक्षाच्या फॉलोअर्सच्या संख्येने भाजपलाही मागे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता या पक्षाचे थेट ‘पाकिस्तान कनेक्शन’ असल्याचा खळबळजनक दावा दिल्लीतील एका भाजप नेत्यांने आकडेवारीसह केला आहे.

भाजप नेत्याचा मोठा दावा

या डिजिटल पक्षाला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळत असून, अवघ्या पाच दिवसांत त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर तब्बल १.५ कोटी (15 Million) फॉलोअर्स जोडले गेले आहेत. फॉलोअर्सच्या या वेगामुळे या पेजने भारतीय जनता पार्टीच्या (BJP) अधिकृत इन्स्टाग्राम पेजलाही मागे टाकले आहे. हे प्रकरण वाढल्यानंतर या पक्षाचे ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट देखील ब्लॉक करण्यात आले होते. आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, दिल्लीतील एका भाजप नेत्यांने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या पक्षाला थेट ‘पाकिस्तान जनता पार्टी’ असे संबोधले आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी ‘सीजेपी’च्या सोशल मीडिया अकाऊंटचा ‘इन्साइट डेटा’ आणि एक ‘पायचार्ट’ देखील शेअर केला आहे.

Pakistan Janta Party pic.twitter.com/Abdlqm0AsL — Tajinder Bagga (@TajinderBagga) May 21, 2026

कोणत्या देशात किती टक्के फॉलोअर्स? पाहा आकडेवारी:

भाजप नेत्याने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, कॉकरोच जनता पार्टीचे निम्म्याहून अधिक समर्थक हे परदेशातील आहेत. या पायचार्टमधील दाव्यानुसार फॉलोअर्सची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे:

  • पाकिस्तान: ४९ टक्के
  • अमेरिका (USA): १४ टक्के
  • बांगलादेश: १४ टक्के
  • भारत (India): ९ टक्के
  • ब्रिटन (UK): ३ टक्के
  • ऑस्ट्रेलिया: ३ टक्के
  • सौदी अरेबिया: ३ टक्के
  • संयुक्त अरब अमिराती (UAE): २ टक्के
  • इतर देश: ३ टक्के

या आकडेवारीनुसार, कॉकरोच जनता पार्टीचे भारतात अवघे ९ टक्के फॉलोअर्स असून, तब्बल ४९ टक्के फॉलोअर्स हे एकट्या पाकिस्तानातील आहेत, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यानंतर सोशल मीडिया युजर्सकडून विविध प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Cockroach Janata Party ला दिग्दर्शक हेमंत ढोमेचा पाठिंबा; म्हणाला, “लोकशाहीसाठी हा सकारात्मक संकेत!”

सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ वक्तव्यातून झाली पक्षाची स्थापना

या पक्षाची पार्श्वभूमी १५ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीशी संबंधित आहे. एका खटल्यादरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सिस्टीममध्ये चुकीच्या मार्गाने घुसणाऱ्या सुशिक्षित लोकांच्या एका गटाची तुलना ‘कॉकरोच’ (झुरळ) आणि ‘परजीवी’ (Parasites) अशी केली होती. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांचा निशाणा फक्त बोगस पदवीधारकांवर होता. परंतु, तोपर्यंत हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि संतप्त तरुणांनी या वक्तव्याचा निषेध म्हणून ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचे डिजिटल आंदोलन उभे केले. आता या आंदोलनाभोवती परदेशी फॉलोअर्सचा वाद निर्माण झाल्याने ही चळवळ अधिकच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

  • कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभा किंवा राजकीय पद देऊ नये
  • मतदानाचा हक्क हिरावून घेणे हा गंभीर गुन्हा मानावा
  • संसद आणि मंत्रिमंडळात महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व
  • माध्यम स्वातंत्र्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट मीडिया समूहांवर निर्बंध
  • पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांवर २० वर्षांची बंदी
मराठी तरुणाची डिजिटल क्रांती! ‘Cockroach Janta Party’मागचा चेहरा कोण? जाणून घ्या अभिजीत दिपके यांची कहाणी

Web Title: Bjp leader claims pakistan connection of cockroach janata party shares insight data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • BJP
  • Cockroach Janta Party
  • pakistan

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat: राम मंदिर देणगी चोरीच्या वादावर सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य; पहिल्यांदाच मांडली स्पष्ट भूमिका!
1

Mohan Bhagwat: राम मंदिर देणगी चोरीच्या वादावर सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य; पहिल्यांदाच मांडली स्पष्ट भूमिका!

Mira Bhayandar News : सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच उतरले रस्त्यावर; पाण्यात बसून आंदोलन, मग महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतंय?
2

Mira Bhayandar News : सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच उतरले रस्त्यावर; पाण्यात बसून आंदोलन, मग महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतंय?

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद
3

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न
4

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.