भाजपा (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी आपल्या पक्षावर टीका करत घरचा आहेर दिला आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी बँक आणि रेल्वेच्या खासगीकरणावर (Privatization Of Railway And Bank) चिंता व्यक्त केली. सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत, असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. पीलीभीतचे खासदार वरुण गांधी अनेकदा आपल्या प्रश्नांवरून भाजपाला (Varun Gandhi Criticized BJP) घेरत असतात. यावेळी त्यांनी बँक आणि रेल्वेच्या खासगीकरणावर भाष्य केले आहे.
केवल बैंक और रेलवे का निजीकरण ही 5 लाख कर्मचारियों को ‘जबरन सेवानिवृत्त’ यानि बेरोजगार कर देगा।
समाप्त होती हर नौकरी के साथ ही समाप्त हो जाती है लाखों परिवारों की उम्मीदें।
सामाजिक स्तर पर आर्थिक असमानता पैदा कर एक ‘लोक कल्याणकारी सरकार’ पूंजीवाद को बढ़ावा कभी नहीं दे सकती।
— Varun Gandhi (@varungandhi80) February 22, 2022
“केवळ बँका आणि रेल्वेचे खाजगीकरण केल्याने पाच लाख कर्मचारी बळजबरीने सेवानिवृत्त म्हणजेच बेरोजगार होतील. प्रत्येकाचे काम संपल्याने लाखो कुटुंबांच्या आशा संपत आहेत. सामाजिक स्तरावर आर्थिक विषमता निर्माण करून ‘लोककल्याणकारी सरकार’ कधीही भांडवलशाहीला चालना देऊ शकत नाही,” असे ट्विट वरुण गांधी यांनी केले आहे.
[read_also content=”रशिया – युक्रेन वादाचा शेअर बाजाराला मोठा फटका, सेन्सेक्सची ३८३ अंकांची घसरण https://www.navarashtra.com/business/russia-ukraine-dispute-effect-on-share-market-sensex-down-by-383-points-nrsr-243406/”]
याआधीही राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी खाजगीकरणावरुन भाजपा सरकारला घेरले आहेत. भारताचे रेल्वेचे जाळे हे जगातील सर्वात मोठे रेल्वेपैकी आहे. भारतीय रेल्वे १३ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देते. गेल्या वर्षी जेव्हा आणखी प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा माजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेचे कधीही खाजगीकरण होणार नाही, असे म्हटले होते.
सरकारच्या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणालाही विरोधकांनी विरोध दर्शवला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र हे सरकार एक एक करून विलीनीकरण करत आहे. त्यामुळे गरिबांना बँकांचा लाभ मिळणार नाही. काही मोजक्याच लोकांना बँकांचा लाभ मिळावा म्हणून हे काम केले जात आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.