नात्यातील विश्वास का तुटतो
कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर असतो. जोपर्यंत जोडीदार एकमेकांवर विश्वास ठेवतात तोपर्यंत नातं मजबूत आणि दीर्घकाळ टिकते. पण जर विश्वास तुटला तर प्रेम आणि एकत्रित असूनही नातं कमकुवत होऊ लागते. बऱ्याचदा लोकांना वाटते की नात्यातील विश्वास फक्त विश्वासघात किंवा फसवणुकीमुळेच तुटतो, पण तसे अजिबात नाही.
प्रसिद्ध रिलेशनशिप कोच आणि लेखक ज्वाल भट्ट यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की नात्यांमधील विश्वास इतर अनेक कारणांमुळेही तुटतो. तुम्हाला कदाचित या गोष्टी माहीत असतील पण आंधळ्या प्रेमापोटी त्या स्वीकारणं कठीण होत असेल. नात्यात विश्वास नसण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत आणि ती तुम्ही जाणून घेतली तर कदाचित तुम्ही तुमच्या नात्याला वाचवू शकता (फोटो सौजन्य – iStock)
रिलेशनशिप तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वारंवार वचने मोडणे किंवा जे सांगितले आहे त्याच्या विपरीत वागणे अथवा सतत चुकीचे बोलणे आणि जे सांगत असाल त्याच्यापेक्षा दुसरे काहीतरी करणे यामुळे नात्यातील विश्वास कमी होऊ शकतो. यामुळे समोरची व्यक्ती केवळ कारणं देत आपल्याला या नात्यात गृहीत धरत आहे हेच मनात येऊ लागतं आणि नात्यातील दुरावा वाढू लागतो.
Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय
लहान असो वा मोठे, खोटे बोलणे नात्यात विषासारखे काम करते. एकदा खोटे बोलणे पकडले गेले की जोडीदार प्रत्येक गोष्टीवर शंका घेऊ लागतो. तुम्ही सतत आपल्या जोडीदारासह खोटं बोलत असाल तर नात्यातील विश्वास टिकवणं कठीण आहे. जोडीदाराची सहनशक्ती संपल्यानंतर या नात्यात कोणतंही स्वारस्य उरणार नाही आणि तुमच्यावर प्रेम करत असणारी व्यक्ती एका वेळेनंतर सोडून जाईल.
जर तुम्ही काहीतरी एक सांगता वा बोलता आणि दुसरे काहीतरी करता किंवा तुमचे वर्तन वारंवार बदलते, तर यामुळे विश्वासही डळमळीत होतो. तुम्ही सतत तुमच्या जोडीदाराला टोलवाटोलवीची कारणं देत असाल तर विश्वास राहणं कठीण आहे. तुमच्या या अस्थिर वर्तनामुळे नात्याचा पायाच पूर्ण डळमळतो
ज्वाल भट्ट म्हणतात की, जर तुम्ही तुमच्या हृदयातील शब्द मोकळे केले नाही आणि उघडपणे प्रेम व्यक्त केले नाही, तर जोडीदाराला असे वाटते की तुम्ही त्यांना महत्त्व देत नाही. यामुळे अंतर वाढू लागते. तुमच्या नात्याला कितीही वर्ष झाली असली तरीही आपल्या जोडीदाराची स्तुती करणं अथवा त्यांच्याबाबत प्रेम व्यक्त करणं खूपच महत्त्वाचं आहे. तुमचा वा तुमची जोडीदार तुमच्या तोंडून प्रशंसा ऐकण्यासाठी सजत असतात अथवा काहीतरी करत असतात, मनातील भावना बोलून न दाखवल्यास समोरच्या व्यक्तीला अधिक त्रास होतो आणि विश्वास कमी होऊ लागतो.
आनंदात एकत्र राहणे सोपे आहे, परंतु जेव्हा तुम्ही कठीण काळात तुमच्या जोडीदाराला साथ देता तेव्हा खरा विश्वास निर्माण होतो. जर असे झाले नाही तर नाते कमकुवत होते. अशावेळी तुमच्या जोडीदाराला तुमची सर्वात जास्त गरज असते. शरीरापेक्षा मानसिक गरज जास्त भासते. त्यामुळे तुमचे त्यांच्याजवळ नसणे खूपच त्रासदायक ठरते आणि नातं तुटू शकतं
ChatGPT तुमचं नातं वाचवू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं AI Therapy Trend नात्यासाठी योग्य आहे की नाही
जर तुम्ही लहानशा वादात किंवा भांडणात ब्रेकअप किंवा घटस्फोटाची वारंवार धमकी दिली तर ते नाते कमकुवत करते. अगदी सहनशक्तीच्या पलिकडे सतत भांडणं होत असतील तर ही स्थिती योग्य आहे, याचा अर्थ आता पुढे काहीही घडू शकणार नाही. पण लहानसहान गोष्टीसाठी ही धमकी देणं योग्य नाही
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वैयक्तिक गोष्टी किंवा गुपितं इतरांसोबत शेअर केली तर ते तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकत नाहीत. कारण हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा मानसिक धक्का असतो. तुमच्यावर विश्वास ठेवत ते आपल्या मनातील गोष्टी तुमच्याजवळ सांगतात आणि त्यामुळे असं करणं अजिबात योग्य नाही
या सर्वांव्यतिरिक्त, रिलेशनशिप एक्सपर्टनुसार, प्रत्येक व्यक्ती चुका करते, परंतु जर तुम्ही तुमची चूक स्वीकारणे आणि ती सुधारणे टाळले तर तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जाऊ लागतो. तुम्ही तीच चूक पुन्हा पुन्हा करत असूनही Attitude दाखवत असाल तर हे नातं टिकणं कठीण आहे. त्यामुळे चूक करत असाल तर त्या चुकांमधून सुधारणा करा नाहीतर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली तुम्हाला कळणारही नाहाी
म्हणजेच, नात्यातील विश्वास केवळ फसवणूक केल्याने तुटत नाही, तर छोट्या सवयी आणि वर्तनदेखील विश्वास डळमळीत होण्याचे कारण बनू शकतात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत मजबूत नाते हवे असेल तर प्रामाणिक रहा, तुमचे वचन पाळा आणि कठीण काळात त्यांना साथ द्या.
View this post on Instagram
A post shared by Javal Bhatt | Relationship Coach, Motivator, Writer (@jb.writer)