कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई: मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय जमिनीवर मत्स्यव्यवसाय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी १६१ कोटींच्या निधी मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्री भरणे म्हणाले की, मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या भागात शासकीस मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याची सूचना मंत्री राणे यांनी मांडली आहे. या महाविद्यालयाच्या बांधकाम तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी १६१ कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर करावा. शासनाच्या सर्व मान्यता घेवून इमारत बांधकाम, मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाच्या कामांना गती देण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय महाविद्यालय आवश्यक – मंत्री नितेश राणे
मंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा सागर तटीय जिल्हा असून येथे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षीत आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तांत्रिक दृष्टया प्रशिक्षीत आणि व्यावसायिक पदवीधरांसाठी महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विभागाने तांत्रिक बाबींची पूर्तता करून या विद्यापीठाची इमारत बांधकाम, विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, अधिकारी व कर्मचारी भरती प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक बाबींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात शासकीस मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषी मंत्री भरणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, कृषी विभागाचे प्रधानसचिव विकास चंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश
मंत्री नितेश राणेंचे निर्देश
राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन वाढ झाली आहे. येत्या हंगामामध्ये आणखी वाढ अपेक्षित असून त्यासाठी विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत. तसेच राज्यातील तलावामध्ये गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यामुळे तलावातील गाळ काढण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात मत्स्यव्यवसाय हंगामाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री नितेश राणे यांनी या सूचना दिल्या.