Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP President: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?

भाजपच्या अध्यक्षपदासाथी तीन महिला नेत्यांची नवे देखील चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. कदाचित यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून वेगळी खेळी खेळू शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2025 | 11:38 AM
BJP President: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आता वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 6 नावे चर्चेत असल्याचे समजते आहे. सध्या जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपला आहे. सध्या नड्डा हेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. तसेच ते केंद्रात मंत्री देखील आहेत. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीला देखील वेग आला आहे.

नुकतेच भाजपने अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले आहेत. पक्षाच्या घटनेनुसार 50 टक्के राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडून झाल्यावरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होते. सध्या भाजपने 26 प्रदेशाध्यक्ष निवडले आहेत. हिमाचल, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, लडाख, तेलंगण, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिव आणि दमण राज्यांचे प्रदेशधयक्ष निवडले आहेत.

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 6 नावांचा विचार करत असल्याचे समजते आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, भाजपचे सरचिटणीस सुनील बांसल  तर महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कदाचित भाजप महिला नेत्याचे नाव देखील राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडू शकते.

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नेतृत्व संघटनात्मक नेतृत्व, जातीय समीकरणे आणि प्रादेशिक संतुलन या तीन गोष्टी भाजप महत्वाचे लक्षात घेतल्याचे समजते आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता या तीन गोष्टींकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. यासाठी भाजप एक केंद्रीय समिती देखील स्थापन करण्याची शक्यता आहे.

भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीत ट्विस्ट; RSS मोठी खेळी करत घेणार निर्णय

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे नेतृत्व यांच्यात कोणाला अध्यक्ष करायचे यावरून सहमती होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अध्यक्षाच्या निवडीला उशीर होत असल्याचा अंदाज आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. जे.पी. नड्डा यांना पुन्हा निवडणूक न होताच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवल्याने संघ नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यास लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. भाजपमधील अनेक नेते जे.पी. नड्डा यांनाच अध्यक्ष कायम ठेवण्यासाठी आग्रही असल्याचे समजत आहे. तर संघ कदाचित याबाबतीत वेगळी भूमिका घेऊ शकतो.

BJP President: भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीत ट्विस्ट; RSS मोठी खेळी करत घेणार निर्णय; नड्डांवर संघ नाराज? वाचा

सध्या भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, मनोहरलाल खट्टर, स्मृती इराणी यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या अध्यक्षपदासाथी तीन महिला नेत्यांची नवे देखील चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. कदाचित यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून वेगळी खेळी खेळू शकतात. महिला नेत्याला अध्यक्षपदी बसवेल जाऊ शकते. त्यामुळे दिल्लीत संघ आणि भाजपमध्ये चर्चा झाल्यास नेमकी राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि भाजपला नवीन अध्यक्ष कधी मिळणार याची स्पष्टता होण्याची शक्यता आहे.

Web Title: Bjp take election for natioanl president post vinod tawde rss pm modi and amit shah politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • BJP
  • BJP President Election
  • RSS
  • Vinod Tawde

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
3

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.