आसाम BJP वर चढला ओवैसीचा पारा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आसाम भाजपच्या एका व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी आसाम भाजपच्या व्हिडिओचा संदर्भ देताना ओवैसी म्हणाले की ते राज्य मुस्लिम बहुल म्हणून दाखवते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. ते म्हणाले की हे केवळ मतांसाठी भीती दाखविण्याची युक्ती नाही तर हिंदुत्व विचारसरणीचे विकृत रूप आहे. भारतात मुस्लिमांचे अस्तित्व ही भाजपसाठी एक समस्या आहे.
आसाममधील भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत असं चित्र असल्याचा आरोप ओवैसी यांनी केल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओवर आपले स्पष्ट मत मांडत त्यांनी राग व्यक्त केलाय.
मुस्लिमांचे अस्तित्वच समस्या आहे: ओवैसी
एक्स वरील त्यांच्या पोस्टमध्ये ओवैसी म्हणाले, “भाजप आसामने एक घृणास्पद एआय व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये असे दिसून आले आहे की जर भाजप अस्तित्वात नसता तर आसाम मुस्लिम बहुल राज्य बनले असते. ते केवळ मतांसाठी भीती पसरवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर ही हिंदुत्वाची खरी द्वेषपूर्ण विचारसरणी आहे. त्यांच्यासाठी, भारतातील मुस्लिमांचे अस्तित्व हीच समस्या आहे; त्यांचे स्वप्न मुस्लिममुक्त भारत आहे. या सततच्या तक्रारींव्यतिरिक्त, त्यांच्याकडे भारतासाठी कोणतीही दृष्टी नाही.”
ओवैसीने केला राग व्यक्त
BJP Assam has posted a disgusting AI video that shows a Muslim-majority Assam if there was no BJP. They are not fear-mongering just for votes, this is the repulsive Hindutva ideology in true form. The very existence of Muslims in India is a problem for them, their dream is a…
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 17, 2025
भाजपने वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला
खरं तर, आसाम भाजपने X वर एआय-जनरेटेड व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन दिले आहे की, “आम्ही हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.” या एआय व्हिडिओमध्ये गुवाहाटीसह आसाममधील अनेक भाग दाखवले आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. भाजपने मतदारांना हुशारीने मतदान करण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे ओवेसी संतापले आहेत. भाजपने एका व्हिडिओद्वारे काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील दिसत आहेत. यामुळे आता राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर भाजपकडून कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
पहा भाजपने शेअर केलेला व्हिडिओ
We can’t let this dream of Paaijaan to be true!! pic.twitter.com/NllcbTFiwV
— BJP Assam Pradesh (@BJP4Assam) September 15, 2025