भरतपूर : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्री देखील सिग्नलवर लाल दिवा लागताच थांबतील असा निर्णय जाहीर केला आहे. त्यांचा हा निर्णय नाटक असल्याचे राजस्थान काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग यांनी म्हटले आहे. यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हालचालीला त्यांनी नाटक ठरवलं आहे. मंत्री जातात तो मार्ग आधीच ठरलेला असतो पोलिस तैनात असतात मग सिग्नलवर थांबण्याचा प्रश्न येतोच कुठे असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनीही मालवीय यांच्या भाजप प्रवेशावर तिखट हल्ला चढवला असून दिल्लीतून धमकीचे पत्र आल्याचे म्हटले आहे. रंधवा, दोतासरा, विरोधी पक्षनेते टिकाराम जुईले लोकसभा निवडणुकीसंदर्भात परिसर दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते.
मालवीयांच्या प्रवेशावरून भाजपवर हल्लाबोल
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी मालवीय यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल फटकारले. मालविया यांना पक्षानी चार वेळा आमदार, दोनदा मंत्री, दोनदा खासदार आणि पत्नीला जिल्हाप्रमुख केले. आता मालवीय कुठल्यातरी धोक्यात, लोभात, भीतीखाली गेले. आपल्याला विरोधी पक्षनेते केले नाही, असे ते पहिल्याच दिवशी सांगत होते.






