
Abhijeet Dipke, CJP Protest, Saurabh Das, CJP Protest,
CJP Press Conference: राजधानी दिल्लीत एकीकडे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. तर दुसरीकडे जंतरमंतरवर सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “CJPच्या टिमला आज रात्री अटक होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पण शांततेत आंदोलन करणऱ्या आंदोलकांना अटक का केली जाणार आहे, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला आहे. जंतरमंतर वर आयोजित पत्रकार परिषदेत अभिजीत बोलत होते.
नीट पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून कॉकरोच जनता पक्ष (सीजेपी) जवळपास महिनाभर आंदोलन करत आहे. या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील गेल्या २६ दिवसांपासून उपोषणावर होते. मात्र, त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा आपले उपोषण सोडले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, सीजेपी टिमच्या कार्यकर्त्यांना आज रात्री अटक केली जाऊ शकते. पण आम्हाला अटक झाली तरी हे आंदोलन थांबू देऊ नका. गेल्या ३५ दिवसांपासून शांततापूर्ण आंदोलन करत असताना अटकेची काय गरज आहे.
अभिजित दीपके म्हणाले की, आमची टीम महात्मा गांधी आणि बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या आदर्शांचे पालन करते आणि संविधानाच्या मार्गावर विश्वास ठेवते. जर आम्ही शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने आपली मते व्यक्त करत आहोत तर सरकार त्यांना अटक करण्याचा विचार का करत आहे, असा सवाल अभिजीत यांनी उपस्थित केला.
आंदोलकांना अटक करण्यासारखी पाऊले उचलणे ही सरकारसाठी एक गंभीर चूक ठरेल. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवल्याने आणि संसद मार्गावर विद्यार्थी आणि आंदोलकांव झालेल्या लाठीचार्जनंतर हे आंदोनल संपूर्ण देशात पसरले आहे. सीजेपी टीमच्या सदस्यांना अटक झाल्यास आंदोलन आणखी मोठे होऊ शकते, असा इशाराही अभिजीत यांनी दिला आहे. त्यांच्या टीमच्या सदस्यांना ताब्यात घेतल्यास आंदोलन पुढे नेण्याची जबाबदारी देशभरातील समर्थकांवर येईल, असा संदेशही अभिजीत यांनी समर्थकांना दिला आहे. आंदोलनात सहभागी असलेले लोक कायद्याचा आदर करतील आणि देशाला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृत्यात सहभागी होणार नाहीत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
दीपके म्हणाले की, अटक झाल्यास आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचेले पाहिजे. परंतु ते पूर्णपणे शांततापूर्ण मार्गानेच झाले पाहिजे. हिंसाचार किंवा इतर कोणत्याही गैरकृत्यात सहभागी होणाऱ्यांना सीजेपीचे समर्थक मानले जाऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने आपली मते मांडणे हा या आंदोलनाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी, अभिजीत दीपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील, असे म्हटले होते. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत जंतर मंतरवर सुरू असलेले आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी म्हटले होते.