Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP आंदोलनातील मोठा खुलासा! RAF जवानाने चालवली पेलेट गन? सात राऊंड फायरिंगनंतर पाच आंदोलनकर्ते जखमी

CJPच्या संसद मार्चादरम्यान RAFच्या एका जवानाने पेलेट गनचा वापर केल्याचा मोठा दावा समोर आला आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आंदोलनादरम्यान नेमके काय घडले याबाबत नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 27, 2026 | 11:51 AM
CJPच्या आंदोलनातील मोठा खुलासा! RAF जवानाने चालवली पेलेट गन? सात राऊंड फायरिंगनंतर पाच आंदोलनकर्ते जखमी

CJPच्या आंदोलनातील मोठा खुलासा! RAF जवानाने चालवली पेलेट गन? सात राऊंड फायरिंगनंतर पाच आंदोलनकर्ते जखमी

Follow Us
Follow Us:
  • संसद आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या वापराचा दावा
  • CJP आंदोलनावर नवे प्रश्न
  • RAFच्या जवानांची ओळख पटली
20 जुलै रोजी CJPच्या संसद मोर्चादरम्यान दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF)च्या एका जवानाने आपल्या पेलेट गनमधून किमान सात राऊंड फायर केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. यापैकी पाच पेलेट आंदोलनकर्त्यांना लागले, तर दोन जमिनीवर पडल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.

पेलेट गनमुळे कोण जखमी झाले?

मिळालेल्या माहितीनुसार, या फायरिंगमध्ये जखमी झालेल्या किमान तिघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये गुरुग्राममध्ये कार्यरत 25 वर्षीय इरशाद शेख, दिल्ली विद्यापीठातील 19 वर्षीय विद्यार्थी साहिल लोछाब आणि आउटलुक मासिकातील 28 वर्षीय पत्रकाराचा समावेश आहे. आंदोलनादरम्यान पेलेट लागल्यानंतर तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

CJP Protest: जंतरमंतरवरील तरुणांना अन्न पाणी पुरवणाऱ्या मोहम्मद जुनैदच्या कुटुंबियांचा पोलिसांकडून मानसिक छळ

जवानांना फायरिंग का करावी लागली?

चौकशीदरम्यान RAF जवानांच्या ड्युटी लॉगची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कनॉट प्लेस येथे तैनात असलेल्या एका RAF जवानाने एकूण सात पेलेट राऊंड झाडल्याची नोंद आढळली. सूत्रांच्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करत दगडफेक सुरू केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित जवानाने ही फायरिंग केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

CRPF काय म्हणाले?

CRPFचे महासंचालक (डीजी) ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, आंदोलन आता संपले असून सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक मोठ्या कारवाईप्रमाणे या संपूर्ण घटनेचाही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर CRPF मुख्यालयाची अधिकृत भूमिका सार्वजनिक केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

RAF जवानांच्या कामकाजाचा आढावा

22 जुलै रोजी सीमा धुंधिया यांनी दिल्लीतील CRPFच्या कंपनी कमांडर आणि कमांडंट्स यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत जंतर-मंतरवरील आंदोलन आणि ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान RAF जवानांनी केलेल्या कारवाईचा आणि त्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत जवानांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की, बळाचा वापर केवळ अत्यावश्यक आणि मर्यादित प्रमाणातच करावा. त्याआधी शक्य असल्यास आंदोलनकर्त्यांना इशारा द्यावा आणि परिस्थितीनुसार लाठीचार्ज, अश्रुधूराच्या नळकांड्या किंवा इतर नियंत्रणात्मक उपायांचा अवलंब करावा.

संसद मोर्चादरम्यान काय घडले?

CJPच्या ‘संसद चलो’ मोर्चात सहभागी झालेल्या युवकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. या कारवाईनंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन करत सरकारवरील राजकीय दबाव अधिक वाढवला.

E20 Fuel Protest: E20 इंधनाविरोधात एल्गार; ४ ऑगस्टला संसदेला टॅक्सी संघटनांचा घेराव

Web Title: Cjp parliament march raf jawan fired pellet gun big revelation news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • india

संबंधित बातम्या

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा
1

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
2

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
3

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
4

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.