Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन

Cockroach Janta Party: गुरुवारी दुपारी १२:५५ पर्यंत, इंस्टाग्रामवर ही संख्या १.२६ कोटींवर पोहोचली होती. भाजपचे ८७ लाख फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे १.३३ कोटी फॉलोअर्स आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 21, 2026 | 04:25 PM
Cockroach Janta Party, CJP, Abhijeet Deepke, Social Media Viral,

Cockroach Janta Party, CJP, Abhijeet Deepke, Social Media Viral,

Follow Us
Follow Us:

Cockroach Janta Party Account Ban:  कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  CJPचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्यात आले आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतातील स्थानिक नियम, न्यायालयाचे आदेश किंवा कायदेशीर तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती  इन्टाग्रामकडून देण्यात आली आहे.  संस्थापक अभिजीत दीपके यांनीही त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून सीजेपीच्या खात्यावरील बंदीची घोषणा केली.

सीजेपीने सहा दिवसांत सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवले . सरन्यायाधीश  सुर्यकांत यांच्या देशातील तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देशात कॉकरोच जनता पार्टीची मोहिम सुरू झाली. बघता बघता अवघ्या सहा दिवसांतच भाजपपेक्षाही जास्त तरूण या मोहिमेत सहभागी झाले.  देशातील सत्ताधारी भाजप विरोधात देशभरात कॉकरोच जनता पार्टीने रान उठवले.  पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन करण्यात आले आहे.

Cockroach Janta Party News: ‘व्यवस्थेविरोधात राग ते आमदार खासदारांना’; अभिजीत दिपकेंची Exclusive मुलाखत

मिळालेल्या माहितीनुसार,  गुरुवारी दुपारी १२:५५ पर्यंत, इंस्टाग्रामवर ही संख्या १.२६ कोटींवर पोहोचली होती. भाजपचे ८७ लाख फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे १.३३ कोटी फॉलोअर्स आहेत.

दुपारी १२ वाजता, पक्षाचे इंस्टाग्रामवर अंदाजे १,९३,००० फॉलोअर्स होते, पण आता इंस्टाग्रामने भारतातील पक्षाचे खाते बंद केले आहे. पक्षाचे फेसबुक खाते नाही.  CJP चे  इन्स्टाग्राम अकाऊंट बंद झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिजीत म्हणाले की, मी जसा विचार केला होता, नेमके तेच घडले.”  याचदरम्यान दिपके यांनी त्यांच्या पक्षासाठी एक घोषवाक्यही आणि लोगोही तयार केला आहे.  “धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी.” असे घोषवाक्य असून त्याचा लोगोही तयार करण्यात आला होता.

पक्षांतर करणाऱ्यांवर २० वर्षांची बंदी?

सीजेपीच्या जाहीरनाम्यात राजकीय पक्षांतरावर कठोर भूमिका घेतली आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार किंवा खासदारांना २० वर्षे निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

तसेच, केंद्र आणि राज्यातील कॅबिनेट मंत्रीपदांपैकी ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. माध्यम स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भूमिका घेत अंबानी आणि अदानी समूहांच्या मालकीच्या माध्यम संस्थांचे परवाने रद्द करण्याची मागणी जाहीरनाम्यात करण्यात आली असून तथाकथित ‘गोदी मीडिया’ अँकर्सच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभा किंवा राजकीय पद देऊ नये

मतदानाचा हक्क हिरावून घेणे हा गंभीर गुन्हा मानावा

संसद आणि मंत्रिमंडळात महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व

माध्यम स्वातंत्र्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट मीडिया समूहांवर निर्बंध

पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांवर २० वर्षांची बंदी

Cockroach Janata Party: सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चं वादळ; मस्करीतून सुरू झालेली CJP लाखो तरुणांचा आवाज कशी बनली?

कोण आहेत अभिजीत दीपके?

अभिजीत दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील रहिवासी आहेत. ३० वर्षीय अभिजीत यांनी पुण्यातून ब्रॉडकास्ट जर्नालिझमचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठ येथे जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कार्यरत असून डिजिटल नॅरेटिव्ह, सार्वजनिक संवाद आणि सोशल मीडिया मोहिमांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. २०२० ते २०२३ या काळात त्यांनी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान मीम-आधारित प्रचार मोहिमांमध्येही त्यांचा सहभाग होता.

Web Title: Cockroach janta party social media account ban

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
1

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
2

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Maharashtra Live Breaking News in Marathi:  घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
4

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.