Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Kejriwal: “…ते कधी हिंमत करणारही नाहीत”; संदीप दिक्षितांचे केजरीवालांना खुले आव्हान

दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. कॉँग्रेस, आम आदमी पक्ष  आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 30, 2025 | 06:22 PM
Arvind Kejriwal: "...ते कधी हिंमत करणारही नाहीत"; संदीप दिक्षितांचे केजरीवालांना खुले आव्हान

Arvind Kejriwal: "...ते कधी हिंमत करणारही नाहीत"; संदीप दिक्षितांचे केजरीवालांना खुले आव्हान

Follow Us
Follow Us:

Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. प्रचार शिगेला पोहोचला आहे. कॉँग्रेस, आम आदमी पक्ष  आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. इंडिया आघाडीमध्ये एकत्रित असणारे कॉँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्लीची निवडणूक स्वबळावर लढत आहेत. दरम्यान निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसे आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

दिल्ली विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नवी दिल्ली मतदारसंघाचे कॉँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी केजरीवालांना खुले आव्हान दिले आहे. 31 जानेवारी रोजी जंतर-मंतर मैदानावर सार्वजनिकरीत्या चर्चेचे आव्हान दिले आहे. संदीप दीक्षित यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. संदीप दीक्षित हे कॉँग्रेसचे नवी दिल्लीचे उमेदवार आहेत.

कॉँग्रेसचे संदीप दीक्षित यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून ते केजरीवालांवर टीका करत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना संदीप दीक्षित म्हणाले, “मला माहिती आहे की अरविंद केजरीवाल यांच्यात खरेपणाचा सामना करण्याची हिंमतच नाहीये आणि ते कधी हिंमत करणारही नाहीत.  31 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही चर्चा सार्वजनिकरित्या होईल. मला आशा आहे की, तुम्ही स्वतः या प्रश्नांची उत्तरे द्याल किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा अशा वादविवादात द्याल जिथे आपण एकाच व्यासपीठावर एकत्र येऊ शकतो.”

नवी दिल्ली मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली आहे. अरविंद केजरीवाल या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर संदीप दीक्षित हे कॉँग्रेसकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने या जागेवर प्रवेश शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तिरंगी लढत या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ही निवडणूक करो किंवा मरो अशी असणार आहे.

हेही वाचा: Explainer : काँग्रेससाठी कशी असेल यंदाची दिल्लीची निवडणूक? आप-भाजपसमोर निभाव लागणार का? काय सांगतात २०२० चे आकडे?

यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या

दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना नोटिस धाडली आहे.

हेही वाचा: Arvind Kejriwal: यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल? 

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की हरियाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. तथापि, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे.

 

Web Title: Congress candidate sandeep dixit criticizes to former cm arvind kejriwal about open discussion delhi assembly election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • Congress
  • Delhi Assembly Election

संबंधित बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे अल्पशा आजाराने निधन, काँग्रेसला मोठी हानी
1

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे अल्पशा आजाराने निधन, काँग्रेसला मोठी हानी

भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना…; काँग्रेसचा आरोप
2

भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना…; काँग्रेसचा आरोप

राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, शेतकऱ्यांची क्रूर थट्टा काँग्रेस खपवून घेणार नाही; सपकाळांचा इशारा
3

राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, शेतकऱ्यांची क्रूर थट्टा काँग्रेस खपवून घेणार नाही; सपकाळांचा इशारा

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस! प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या ‘कार्यपद्धतीवर नेते नाराज; हायकमांडकडे धाव घेणार?
4

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस! प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या ‘कार्यपद्धतीवर नेते नाराज; हायकमांडकडे धाव घेणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.