Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: ‘हा सामना नाही, ही सट्टेबाजी आहे…’ भारत-पाकिस्तान सामन्यावर काँग्रेस खासदार पुन्हा संतापले

आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर पुन्हा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी या सामन्याला 'सट्टेबाजी' म्हटले असून, ऑपरेशन सिंदूरमुळे याला विरोध दर्शवला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 21, 2025 | 04:22 PM
IND vs PAK (Photo Credit- X)

IND vs PAK (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘हा सामना नाही, ही सट्टेबाजी आहे…’
  • भारत-पाकिस्तान सामन्यावर काँग्रेस खासदार पुन्हा संतापले
  • ऑपरेशन सिंदूर’नंतर सामन्याला विरोध

आशिया कप २०२५ मध्ये आज पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या घटनेनंतर दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. या सामन्यावर आधीही विरोध दर्शवला गेला होता, पण आता पुन्हा एकदा सामन्याला तीव्र विरोध होत आहे.

काँग्रेस खासदार संतापले

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजच्या सुपर फोरच्या सामन्यावर काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी या सामन्याला थेट विरोध दर्शवला आहे. इम्रान मसूद म्हणाले, “हा सामना नाही, ही सट्टेबाजी आहे आणि हा पैशांचा खेळ आहे.” याआधी १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले होते.

ऑपरेशन सिंदूर’नंतर सामन्याला विरोध

काँग्रेस नेते इम्रान मसूद म्हणाले, “ज्या महिलांचे ‘सिंदूर’ पुसले गेले, त्यांना विचारा की त्यांच्यावर काय बीतत असेल. पीडित महिलांनी तर असेही म्हटले की, ‘हे इतके निर्दयी कसे असू शकतात?’ पण यांना तर आपले काम चालवायचे आहे, पैसा कमवायचा आहे.”

#WATCH | Delhi: On the India vs Pakistan Super Four stage match in the Asia Cup 2025 today, Congress MP Imran Masood says, “This isn’t a match; it’s a betting game, a game of money… Ask the sisters whose vermillion has been ruined what they’re going through. They even said,… pic.twitter.com/fgOTGjEUJU

— ANI (@ANI) September 21, 2025


पहिल्या लीग सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवले होते. त्यावेळीही या सामन्याला मोठा विरोध झाला होता. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील पीडितांपासून अनेक नेत्यांनी दोन्ही देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यावर आक्षेप घेतला होता. मागील सामन्यात खेळाडूंमध्ये ‘नो हँडशेक’ वादही झाला होता, आणि आता पुन्हा दोन्ही संघ समोरासमोर येत आहेत.

Raj Thackeray cartoon Art : उठा चला…आपण जिंकलो? राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून भारत-पाक सामन्यावर टीकास्त्र

भाजप नेत्यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

आजच्या सामन्यावर झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रघुबर दास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भारत पुन्हा जिंकेल. संपूर्ण देश आणि पाकिस्तानी लोकांनाही माहीत आहे की विजय भारतीय खेळाडूंचाच होईल.” भाजप नेते दिलीप घोष म्हणाले, “भारत आशिया कपमध्ये चांगला खेळत आहे. मागच्या सामन्यात जे घडले, तेच पुन्हा होईल. ते चांगला खेळतील आणि जिंकतील, अशी सगळ्यांना आशा आहे.”

‘आप’ नेही दर्शवला होता विरोध

आशिया कपच्या पहिल्या सामन्याला काँग्रेसपासून ते आम आदमी पार्टी (आप) पर्यंत सर्वांनीच विरोध दर्शवला होता. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया हँडलवर म्हटले होते की, “पाकिस्तानसोबत सामना खेळणे हा देशद्रोह आहे आणि प्रत्येक भारतीय यामुळे नाराज आहे.” ‘आप’चे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनीही पंतप्रधान मोदींच्या ‘दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही’ या विधानाचा संदर्भ देत सामन्यावर टीका केली होती.

Web Title: Congress mps again angry over india pakistan match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • BJP
  • Congress
  • IND VS PAK
  • Nation News
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs PAK : पाकिस्तान संघ भारतीय भिंत भेदणार? तयार केला खास ‘मास्टरप्लॅन’; महामुकाबल्याची वाढली रंगत 
1

IND vs PAK : पाकिस्तान संघ भारतीय भिंत भेदणार? तयार केला खास ‘मास्टरप्लॅन’; महामुकाबल्याची वाढली रंगत 

Aadhar Card: आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दोन वयोगटांना मिळणार खास सूट
2

Aadhar Card: आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दोन वयोगटांना मिळणार खास सूट

Asia cup 2025 : पाकिस्तानला झटका! IND vs PAK सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्टच सामनाधिकारी;आयसीसीची ताठर भूमिका 
3

Asia cup 2025 : पाकिस्तानला झटका! IND vs PAK सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्टच सामनाधिकारी;आयसीसीची ताठर भूमिका 

IND vs PAK : Dream11 ने 1.1 कोटी पैशांची स्पर्धा सुरू, तुम्हालाही मोफत सहभागी व्हायचे आहे का?
4

IND vs PAK : Dream11 ने 1.1 कोटी पैशांची स्पर्धा सुरू, तुम्हालाही मोफत सहभागी व्हायचे आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.