राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या भारत-पाक सामन्यावर व्यंगचित्र काढले. (फोटो - सोशल मीडिया)
Raj Thackeray cartoon Art on Pahalgam : मुंबई : सध्या आशिया चषक स्पर्धा सुरु असून क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्साहाने सामने बघत आहेत. मात्र आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान झालेल्या सामन्यामुळे भारतात मोठा वाद निर्माण झाला. पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप 26 जणांनी जीव गमावल्यामुळे पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. दुबईमध्ये झालेला हा सामना रद्द करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. मात्र तरीही हा सामना झाला. यामध्ये भारतीय संघ विजयी झाला असला तरी राजकारण्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर आता मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील भारत-पाक या क्रिकेट सामन्यावरुन शहा पिता-पुत्रांना टोला लगावणारे व्यंगचित्र काढले आहे.
भारत-पाक सामन्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्यात आला. या सामन्यामधून पाकिस्तानला पैसे मिळणार असून हेच पैसे पुन्हा दहशतवादासाठी वापरले जाणार असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या मुलगा व आयसीसी अध्यक्ष जय शहा यांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. हा सामना त्यांनी रद्द करावी अशी मागणी विरोधी खासदारांनी केली होती. मात्र तरी देखील सामना झाल्यामुळे अमित व जय शहा यांच्यावर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार टोला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय आहे राज ठाकरेंचे व्यंगचित्र?
मनसे नेते राज ठाकरे यांची व्यंगचित्रकला सर्वश्रूत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राजकीय टीकेचा हा पवित्रा राज ठाकरे हे सांभाळत असल्याचे दिसून येते. राज ठाकरे हे अनेकदा आपल्या व्यंगचित्रातून सध्यस्थितीवर मार्मिक टोला लगावताना दिसतात. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी भारत-पाकच्या क्रिकेट सामन्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली. यामध्ये त्यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप मृत्यूमुखी पडलेले पर्यटक दाखवले आहेत. या पर्यटकांचे मृतदेह सर्वत्र पडलेले दिसून येत आहे. तर मागच्या बाजूला पहलगाममधील डोंगर दऱ्या दाखवण्यात आल्या आहेत.
#पहलगाम #काश्मीर #PahalgamAttack #BCCI #ICC #AsiaCup #INDvsPAK#Cricket pic.twitter.com/ASx9fpB81Y
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांना टोला लगावला आहे. अमित आणि जय शाह यांचे देखील व्यंगचित्र काढण्यात आले असून यामध्ये अमित शाह यांच्या चेहऱ्यावर कुत्सिक हास्य दिसून येत आहे. तर आयसीसी अध्यक्ष जय शाह हे मृतदेहांकडे बघून उठा..चला…आपण जिंकलो आहोत तर पाकिस्तान हरला आहे…, असे म्हणत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर मागे नक्की कोण हारले आणि खरे कोण जिंकले? असा विचार करायला लावणारा प्रश्न विचारण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या क्रिकेट सामन्यावर मनसे नेते राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.