Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉंग्रेसकडून लोकसभेसाठी एकाचवेळी दोन मेगा प्लॅन तयार; मित्र पक्षांना न दुखावता आखली योजना; वाचा कॉंग्रेसची नवीन रणनीती

  • By युवराज भगत
Updated On: Jan 01, 2024 | 04:23 PM
कॉंग्रेसकडून लोकसभेसाठी एकाचवेळी दोन मेगा प्लॅन तयार; मित्र पक्षांना न दुखावता आखली योजना; वाचा कॉंग्रेसची नवीन रणनीती
Follow Us
Follow Us:

Congress Plan For Loksabha Election : राम मंदिर (Ram Mandir) सोहळ्याच्या आडून भाजपने (BJP) लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) रणशिंग फुंकले असतानाच आता काँग्रेसनेही (Congress Mega Plan for Loksabha Election) एकाचवेळी दोन मेगा प्लॅन करीत तयारीसाठी शड्डू ठोकला आहे. इंडिया आघाडीमधील (INDIA Allies) मित्रपक्षांना न दुखावता काँग्रेसकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या 52 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच, 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या 209 लोकसभा मतरदारसंघांसह एकूण 261 मतदारसंघात काँग्रेसने थेट लक्ष केंद्रित केले आहे. पक्षांतर्गत सर्वे तसेच वेगवेगळ्या प्रकारे मित्रपक्षांना न दुखावता उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

काँग्रेसची थेट लढत भाजपशी लढत

आठ राज्यांत 100 प्लस जागा जिंकण्यासाठी प्रयत्न (Congress Plan For Loksabha Election) दुसऱ्या टप्प्यामध्ये आठ राज्यांत प्रादेशिक पक्ष प्रभावी नसल्याने काँग्रेसची थेट लढत भाजपशी आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राज्यस्थान, गुजरात, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल, कर्नाटक व आसाम राज्यांचा सहभाग आहे. या राज्यातील 142 लोकसभेच्या जागा येतात. सध्या या ठिकाणी भाजपचे 130 खासदार आहेत. तुलनेत काँग्रेसकडे फक्त 7 खासदार आहेत. त्यामुळे या आठ राज्यांमध्ये 100 प्लस लोकसभा जागा जिंकण्यासाठी प्रयत्न काँग्रेस करणार आहे.

पक्ष 291 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीमधील जागा वाटप करण्यापूर्वी, काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीने 29 आणि 30 डिसेंबर रोजी मॅरेथॉन विचारमंथन सत्र आयोजित केले होते. यामध्ये पक्षाने 10 राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांना सांगितले की, पक्ष 291 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस इंडिया आघाडीकडून 85 जागांची मागणी करणार आहे. लोकसभेचे चित्र लक्षात घेऊन इंडिया आघाडी जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवर कोणतीही तडजोड नाही
आघाडीतील पक्षांशी समन्वयाचे काही मापदंड काँग्रेसने ठेवले आहेत. त्यानुसार गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या लोकसभेच्या जागांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 2014 पासून झालेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या आधारे पक्ष जागा मागणार आहे.

काँग्रेस कमी जागांवर उमेदवार उभे करणार
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 375 पेक्षा जास्त जागा लढवणार हे निश्चित आहे. 2014 च्या निवडणुकीत 464 आणि 2019 मध्ये 421 उमेदवार उभे केले होते. 2014 मध्ये काँग्रेसचे उमेदवार 224 जागांवर दुसऱ्या तर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते. जिंकलेल्या जागांची संख्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या आधारे काँग्रेस इंडिया आघाडीच्या प्रभावाखाली असलेल्या राज्यांमध्ये 85 पेक्षा जास्त जागांवर दावा करेल. उर्वरित राज्यांमध्ये 291 जागांवर एकटाच निवडणूक लढवणार आहे.

14 जानेवारीपूर्वी जागा वाटप
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) याच आठवड्यात इंडिया आघाडीच्या उर्वरित नेत्यांशी चर्चेसाठी आपला प्रतिनिधी ठरवतील. राष्ट्रीय समिती आपला अहवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सादर करणार आहे. खरगे यांनी 4 जानेवारीला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेत्यांची बैठक बोलावली आहे. पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा समितीची बैठकही त्याच दिवशी होणार आहे. 14 जानेवारीपासून राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेपूर्वी जागांचे वाटप केले जाईल.

Web Title: Congress prepares two mega plans for lok sabha 2024 simultaneously planned without offending allies read congress new strategy nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2024 | 04:21 PM

Topics:  

  • Congress
  • loksabha election 2024

संबंधित बातम्या

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन
1

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन

‘स्वतःच्या रक्ताशी गद्दारी करत नाही ना?’, संविधान हत्या दिनाच्या पोस्टवरून काँग्रेसचा अशोक चव्हाणांना टोला
2

‘स्वतःच्या रक्ताशी गद्दारी करत नाही ना?’, संविधान हत्या दिनाच्या पोस्टवरून काँग्रेसचा अशोक चव्हाणांना टोला

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक
3

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
4

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.