
Washim Congress Protest
यावेळी दिलीप सरनाईक सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, चंद्रकांत साठे, जावेद सौदागर, राजू वानखडे, सोनाली लांडगे, मधुकर जुमडे, डॉ. श्याम गाभणे, किसन मस्के, परसराम भोयर, गजानन गोटे, विजय देशमुख, रामनाथ राठोड, रामेश्वर देवकर, नंदा गनोदे, मनीष भालेराव, भीमराव लोखंडे, दिलीप देशमुख, इफ्तिकार पटेल, गजानन राठोड, संजय शिंदे, अरविंद लाठीया, राजीक शेख, योगेश बळी, सागर गोरे, सय्यद आजम, शेख नजीर, उदेभान लांडगे, अमोल धोटे, जय चव्हाण, सय्यद गुलाब सय्यद मनवर, मीनाताई वाठोरे, संजय भानावत, समाधान माने, गजानन भोने, बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन उज्वल देशमुख यांनी केले तर आभार सुरेश रत्नपारखी यांनी मानले.
निवेदनात काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवित निवडणूक आयोगाने स्वतंत्र व निष्पक्षपणे काम करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांच्या नोंदणीतील अनियमितता तसेच निवडणूक आयोगाच्या आयटी प्रणालीच्या केंद्रीकरणाबाबत निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्येत मोठी वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदभांतील आकडेवारीची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.