Could It Be Such A Monstrous Cyclone What Is The Secret Of Lord Krishnas Dwarka Submerged In The Sea Nrab
‘ते’ही असंच एखादं राक्षसी चक्रीवादळ असेल का? समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णाच्या द्वारकेचं रहस्य काय?
महा चक्रीवादळ बिपरजॉय असं संबोधण्यात येणारं चक्रीवादळ वेगानं गुजरातकडे सरकतं आहे. या वादळातून सुखरुप सुटका व्हावी यासाठी द्वारकेतील द्वारकाधीशआच्या मंदिरावर दोन ध्वज लावण्यात आले आहेत.
अहमदाबाद : महा चक्रीवादळ बिपरजॉय असं संबोधण्यात येणारं चक्रीवादळ वेगानं गुजरातकडे सरकतं आहे. या वादळातून सुखरुप सुटका व्हावी यासाठी द्वारकेतील द्वारकाधीशआच्या मंदिरावर दोन ध्वज लावण्यात आले आहेत. या चक्रीवादळानं फारसं नुकसान होऊ नये यासाठी सगळेच स्थानिक आणि गुजरातचे रहिवाशी द्वारकाधीशाकडे पार्र्थना करताना दिसतायेत. अरबी समुद्रात तयार झालेल्या या विनाशकारी आणि भयानक चक्रीवादळानं महाभारताच्या काळात वसवण्यात आलेल्या एका नगराच्या आठवणीही ताज्या केल्या आहेत.
मथुरा सोडल्यानंतर श्रीकृष्ण सगळ्या यादवांना घेऊन गुजरात राज्यात आला होता. तिथं त्यानं द्वारका नावाचं एक शहर वसवलं होतं अशी मान्यता आहे. 2017 साली पुरातत्व विभागानं त्या भव्य द्वारका नगरीचे काही अवशेषही समुद्रातून शोढून काढले होते. या शहराचं सुरुवातीचं नाव कुशस्थली असं ठेवण्यात आलं होतं. आताच्या बिपरजॉय या चक्रीवादळाच्या निमित्तानं अशाच एखाद्या चक्रीवादळाचा फटका द्वारका नगरीला बसला होता का, अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे. अशा एखाद्या प्रलयकारी चक्रीवादळात श्रीकृष्णानं वसवलेल्या द्वारकेचा घास घेतला होता का, द्वारका नगरी या चक्रीवादळात समुद्रात बुडाली होती का, असे प्रश्न आता विचारण्यात येतायेत.
द्वारकेचे समुद्रात मिळाले होते अवशेष
काही वर्षांपूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसियोनोग्राफीच्या सर्वेक्षणात समुर्दातून द्वारका नगरीचे काही अवशेष मिळाले होते. दरवाजांचं शहर अशी ओळख असल्यानं या शहराला द्वारका या नावानं ओळखलं जात असे. समुद्रात करण्यात आलेल्या संशोधनात समुद्रातून 3 हजार वर्षांपूर्वीची भांडी पुण्याच्या कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना मिळाली होती. त्यानंतर पुरातत्व विभागानं या ठिकाणी शोध मोहीम हाती घएतली त्यात काही नाणी आणि ग्रेनाईटपासून तयार केलेलं बांधकाम सापडलं होतं.
कशी बुडाली द्वारका नगरी
पुण्याच्या एका पुरातत्व विभागाच्या कॉलेजच्या मुलांना आणि नंतर पुरातत्व विभागाला नगरीचे अवशेष मिळाल्यानंतर ही नगरी पुन्हा वसवण्यात यावी असा आग्रह करण्यात आला. 26 जुलै 2018 साली यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबतचं पत्र लिहिलं होतं. यात स्वामींनी लिहिलं होतं की गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापासून 20 किमी अंतरावर 40 फुटांवर बऱ्याच वस्तू सापडलेल्या आहेत. हे द्वारका नगरीचे अवशेष आहेत हे स्पष्ट आहे. युपीएच्या काळात हा शोध लागला होता. मात्र सरकारनं त्यासाठी अपेक्षित निधी दिला नाही. महाभराताच्या युद्धानंतर 1700 वर्षांनी इ. स. पूर्व 1443 मध्ये द्वारका शहर समुद्रात बुडालं. जगात भारत ही सर्वाच प्राचीन सभ्यता असल्याचा हा मोठा पुरावा असल्याचं स्वामी यांचं म्हणणं होतं. त्यासाठी या द्वारका नगरीचं पुननिर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.
दोन शापांची होते चर्चा
मथुरेहून द्वारकेत आलेल्या भगवान श्रीकृष्णानं या ठिकाणी 36 वर्ष वास्तव्य केलं असं सांगण्यात येतं. ज्यावेळी त्यांनी हे शहर सोडलं त्यावेळी हे शहर बुडालं अशी मान्यता आहे. यदुवंशाचा संहार झाला असंही मानण्यात येतं. महाभारताच्या अखेरीस गांधारीनं कौरवांचा नाश झाला तसा यदुवंशाचा नाश होईल, असा शाप श्रीकृष्णाला दिला होता, असं सांगण्यात येतं. त्यामुळे द्वारका बुडाल्याची मान्यता आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळाच्या निमित्तानं अशाच एखाद्या मोठ्या वादळानं द्वारका बुडाली होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.
Web Title: Could it be such a monstrous cyclone what is the secret of lord krishnas dwarka submerged in the sea nrab