चीनला चक्रीवादळाचा फटका (फोटो- istockphoto)
चीन देशाला Tropical चक्रीवादळाचा फटका
हाँगकाँगमध्ये शाळा बंद
अनेक विमानांची उड्डाणे रद्द
Tropical Storm in China: चीन देशात चक्रीवादळ आले आहे. चीनमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. Tropical चक्रीवादळामुळे चीनमध्ये हाहा:कार उडाला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये नैसर्गिक आपत्ती येताना पाहायला मिळत आहे. भारतात देखील पर्वतीय राज्यांमध्ये ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. चीनमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चीनजवळील काही भाग व हाँगकाँग परिसरात तपाह चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरात वाऱ्याचा वेग 170 किमी प्रतीतास इतका असल्याचे पाहायला मिळत आहे. या चक्रीवादळामुळे भूस्खलन किंवा अन्य नुकससन झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र वाऱ्याचा वेग पाहता चीनमधील जनजीवन आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
तपाह चक्रीवादळ आल्यामुळे चीनचा काही भाग व हाँगकाँग भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हाँगकाँगमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. खराब हवामानामुळे विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे अनेक कंपन्या, कार्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत.
हाँगकाँगमध्ये काय आहे परिस्थिती?
तपाह चक्रीवादळ आल्यामुळे चीनमध्ये काही परिसरात स्थिती खराब झाली आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे शाळांना, अनेक कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये तर वाहूतकीवर परिणाम झाला आहे. अनेक सेवा बंद केल्या गेल्या आहेत. मेट्रो देखील संथगतीने काहीच मार्गांवर सुरू आहे. चीनमधील हे तिसरे शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिकेवर घोंगावतय ‘किको’ वादळ
अमेरिकेच्या हवाई राज्यावर मोठ्या संकटाचा इशारा जारी करण्यात आला आहे. राष्ट्रीय हवामन सेवेच्या (NWS) ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या हवाई राज्यावर किको या शक्तीशाली वादळाचे संकट घोंगावत आहे. शनिवारी (०६ सप्टेंबर) सकाळी हे वादळ होनोलुलुपासून १,२०५ मैल आग्नेये दिशेला होते. या वादळाचा वेग १३० मैल प्रती तास नोंदवण्यात आला आहे.
अमेरिकेच्या हवाई राज्यावर घोंगावतय ‘किको’ वादळाचे संकट; आणीबाणीचा इशारा जारी
हवामान खात्याने रविवारी हे वादळ बिग आयलंड आणि माऊई बेटावर धडकण्याची भीती व्यक्त केली आहे. तर सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे वादळ पूर्व हवाई बेटसमूहाला धडकले असे सांगतिले आहे. याचा परिणाम भीषण असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवाई राज्याचे कार्यवाहक राज्यपाल ल्यूक यांनी नागरिकांना आणि पर्यटकांना अधिकृत अपडेट्स चेक करण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.