
DCM Ajit Pawar accidental death Yogi Adityanath Rahul Gandhi Nitin Gadkari express condolences
Ajit Pawar Plane Crash: पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. . बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल गांधींनी लिहिले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आज विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. या दुःखाच्या क्षणी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, अशा शोकभावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजित पवार जी और उनके सहयात्रियों की आज हवाई जहाज दुर्घटना में निधन का समाचार अत्यंत पीड़ादायक है। इस शोक के पल में महाराष्ट्र की जनता के साथ हूं। समस्त पवार परिवार और प्रियजनों को इस दुख की घड़ी में अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं। — Rahul Gandhi (@RahulGandhi) January 28, 2026
हे देखील वाचा : कर्तव्यदक्ष आणि रोखठोक नेतृत्व! अजित पवारांच्या मृत्यूवर मंत्रिमंडळातील नेते भावूक
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो, असे नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक… — Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 28, 2026
हे देखील वाचा : अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार? तिढा सुटणार कसा?
त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोकभावना व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि शिष्टमंडळातील इतर सदस्यांचे निधन अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. मी भगवान श्री राम यांच्याकडे मृतांच्या आत्म्यांना शांती आणि शोकाकुल कुटुंबांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती देण्याची प्रार्थना करतो, असे योगी आदित्यनाथ यांनी लिहिले आहे.