Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज जरांगे पाटील यांना तडीपार करणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत मला तडीपार करणार असल्याचा दावा केला होता. यावर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 23, 2024 | 07:45 PM
मनोज जरांगे पाटील यांना तडीपार करणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
Follow Us
Follow Us:

दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीवारी केली. निवडणूकीपूर्वीची त्यांची ही वारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत मला तडीपार करणार असल्याचा दावा केला होता. यावर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, “आमचे खूप हितचिंतक आहेत. ते हितचिंतक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन काहीतरी सांगत असतात. त्यावर जरांगे पाटील बोलतात. असं कुणालाही तडीपार केले जात नाही. तडीपार करण्यासारखे त्यांच्यावर खटले दाखल आहेत का? तर तसे अजिबात नाही. अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे काम करत असतात. अशी लोक जरांगे पाटील यांना काहीतरी सांगत असतात. जरांगे पाटील आणि आंदोलकांवर ज्या केसेस दाखल आहेत, त्या मागे घेतल्या जाणार आहेत,” असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Media Interaction at New Delhi..
नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद..#BJP #Maharashtra #NewDelhi #LokSabha #PhirEkBaarModiSarkar pic.twitter.com/uMomvZZntk
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 23, 2024

पुढे ते म्हणाले, “ज्याठिकाणी जाळपोळ, तोडफोड झाली, पोलिसांवर हल्ला झालेला आहे, अशा केसेस परत घेणे शक्य होणार नाही. मात्र इतर केसेस परत घेण्याची घोषणा करून त्यावर कामही सुरू केले आहे. सध्या २४ जिल्ह्यांमध्ये तपासावर असलेल्या एकूण ४९२ केसेस आहेत. त्याची छाननी सुरू झाली आहे. १७२ केसेस परत घेण्यासंदर्भात शिफारसही दिली आहे. सहा केसेस मागे घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. उर्वरित केसेसची छाननी सुरू आहे. केसेस मागे घेण्यासाठी संबंधित लोकांना जबाबासाठी पुन्हा बोलवावे लागते. त्याची एक कायदेशीर प्रक्रिया असून ती पूर्ण करावीच लागते. पण जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावले तरी नवीन केस दाखल झाली, असे सांगितले जाते. मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

उद्धव ठाकरे हे टोमणे बहाद्दर 

ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी त्यांना टोमणे बहाद्दर ही उपमा दिली आहे. माझी उपमा कशी सार्थ ठरेल, याचा आटोकाट प्रयत्न ते करत असतात. फडणवीसांनी उपमा दिली आहे तर ती सार्थच ठरविली पाहीजे, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते टोमणे मारत असतात. काहीतरी बोलत असतात. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एक वाक्य विकासावर बोलून दाखवावे. सामान्य माणसाच्या आयुष्यात तुम्ही काय बदल करणार आहात किंवा केला आहे? याबद्दल सांगण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी जहरी टीका केली.

Web Title: Dcm devendra fadnavis clear about maratha reservation protest manoj jarange patil allegations political news update nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • political news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

NEET पेपर लीक झाला तर फेरपरिक्षा, मग खासदारांच्या फुटीनंतर…? रोहित पवारांचा सरकारला बोचरा सवाल
1

NEET पेपर लीक झाला तर फेरपरिक्षा, मग खासदारांच्या फुटीनंतर…? रोहित पवारांचा सरकारला बोचरा सवाल

Operation Tiger : ‘उद्धव ठाकरेंवरुन खासदारांचा विश्वास उडाला’; शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागत करू – मिलिंद देवरा
2

Operation Tiger : ‘उद्धव ठाकरेंवरुन खासदारांचा विश्वास उडाला’; शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागत करू – मिलिंद देवरा

शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास! भुजबळांपासून सुरु झालेलं सत्र शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत कसं पोहोचलं? वाचा सविस्तर
3

शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास! भुजबळांपासून सुरु झालेलं सत्र शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत कसं पोहोचलं? वाचा सविस्तर

Shivsena Opration Tiger : 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? ‘…म्हणून शिवसेना सोडली’, समोर आलं धक्कादायक कारण
4

Shivsena Opration Tiger : 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? ‘…म्हणून शिवसेना सोडली’, समोर आलं धक्कादायक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.