Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Exit Polls 2025: दिल्लीत चालणार मोदी ‘मॅजिक’; ‘या’ एक्झिट पोलने उडाली केजरीवालांची झोप; काँग्रेसला फक्त…

Delhi Exit Poll Result 2025: पीपल इनसाईटने जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2025 | 07:23 PM
Delhi Exit Polls 2025: दिल्लीत चालणार मोदी 'मॅजिक'; 'या' एक्झिट पोलने उडाली केजरीवालांची झोप; काँग्रेसला फक्त...

Delhi Exit Polls 2025: दिल्लीत चालणार मोदी 'मॅजिक'; 'या' एक्झिट पोलने उडाली केजरीवालांची झोप; काँग्रेसला फक्त...

Follow Us
Close
Follow Us:

Which Party Wins in Delhi Exit Polls: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70  टक्के मतदान झाले आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडले. दरम्यान मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी दिल्ली विधानसभेत काय निकाल लागू शकतो याबाबत काही अंदाज वर्तवले आहेत. समोर आलेले एक्झिट पोलचे अंदाज धक्कादायक आहेत. पीपल इनसाईटने दिल्ली विधानसभेसाठी आपला अंदाज वर्तवला आहे.

पीपल इनसाईटने जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पीपल इनसाईटच्या अंदाजानुसार, दिल्लीत भाजपची सरशी होण्याची शक्यता आहे. आज दिल्ली विधनसभेसाठी 57.70 टक्के मतदान झाले आहे. 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाची टक्केवारी आणि एक्झिट पोलची आकडेवारी यामुळे सर्व पक्षांची धाकधूक वाढली आहे.

काय आहे पीपल्स इनसाईटने दिलेला एक्झिट पोल?

भाजप – 40 ते 44 जागा
आम आदमी पक्ष – 25 ते 29 जागा
कॉँग्रेस- 0 ते 1 जागा

दिल्लीत मतदानाची टक्केवारी घसरली? 5 पर्यंत केवळ 57 टक्के मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70  टक्के मतदान झाले आहे. दिल्ली विधांसाभहकीय 70 जागांसाठी आज मतदान पार पडले. 70 जागांचा निकाल 8 तारखेला येणार आहे. त्यावेळीच दिल्लीत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्लीत 70 जागांसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

हेही वाचा: Delhi Assembly Election: दिल्लीत मतदानाची टक्केवारी घसरली? 5 पर्यंत केवळ 57 टक्के मतदान; धाकधूक वाढली

दिल्लीत 17,766  मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीमध्ये सुमारे 1 कोटी 56 लाख मतदार मतदान करण्यास पात्र असल्याचे समजते आहे. त्यामुळे 8 तारखेला मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे ते स्पष्ट होणार आहे. मात्र 2020 पेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे म्हटले जात आहे. काही जागांवर अजूनही मतदान सुरू आहे. त्यामुळे अंतिम टक्केवारी येणे बाकी आहे. आम आदमी पक्ष, भाजप , कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष आपण केलेल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर कॉँग्रेस आणि भाजप सत्ता परिवर्तन करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत.

‘आप’-भाजपमध्ये ‘कांटे की टक्कर’

दिल्लीच्या निवडणुकीत कोणते मुद्दे निर्णायक ठरणार हे जाणून घेऊयात.

मतदानाची टक्केवारी

दिल्लीत 2015 मध्ये 67.13 टक्के तर 2020 मध्ये 62. 59 टक्के मतदान झाले हते. दोन्ही वेळेस मतदान हे शनिवारी झाले होते. काही प्रमाणात मतदान कमी झाले असल्याची चर्चा होती. यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदानांची टक्केवारी वाढल्यास कोणाला फायदा होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा: Delhi Assembly Election: ‘आप’-भाजपमध्ये ‘कांटे की टक्कर’; ‘हे’ निर्णायक मुद्दे ठरवणार दिल्लीचा मुख्यमंत्री

विभाजित मतदान पद्धत

2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतांचे विभाजन पद्धती पहायला मिळाली. म्हणजेच मतदारांनी लोकसभेत एका पक्षाला तर विधानसभेत दुसऱ्या पक्षाला मतदान केले होते. कोणती निवडणूक आहे त्यावरून मतदान करतात असे दिसून आले आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेले मतदार देखील असतात. दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या बाजूने मतदान करणारे मतदार आहेत.

 

Web Title: Delhi assembly elections 2025 exit polls updates in marathi peoples insight forecast bjp won 40 to 44 and aap 25 and congress 1 latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 07:11 PM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • Delhi Assembly Election
  • Exit Polls

संबंधित बातम्या

Mira Bhayander : शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपचा ‘जनता दरबार ; मेहता-सरनाईक संघर्ष शिगेला
1

Mira Bhayander : शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपचा ‘जनता दरबार ; मेहता-सरनाईक संघर्ष शिगेला

महिला आरक्षण विधेयकावरून दिल्लीत रणकंदन! राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर भाजपचा एल्गार; ‘विश्वासघाता’चा आरोप करत जोरदार निदर्शने
2

महिला आरक्षण विधेयकावरून दिल्लीत रणकंदन! राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर भाजपचा एल्गार; ‘विश्वासघाता’चा आरोप करत जोरदार निदर्शने

Mira Bhayandar: व्हायरल व्हिडीओवरून भाजप शिवसेना आमनेसामने ; भाईंदरमध्ये राजकीय रणकंदन
3

Mira Bhayandar: व्हायरल व्हिडीओवरून भाजप शिवसेना आमनेसामने ; भाईंदरमध्ये राजकीय रणकंदन

संघर्षातून यशाचं शिखर : विनोद तावडे – ‘पार्टी विथ डिफरन्स’चा खरा चेहरा!
4

संघर्षातून यशाचं शिखर : विनोद तावडे – ‘पार्टी विथ डिफरन्स’चा खरा चेहरा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.