दिल्ली विधानसभा कोण जिंकणार (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मीडिया)
Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाले आहे. दिल्ली विधांसाभहकीय 70 जागांसाठी आज मतदान पार पडले. 70 जागांचा निकाल 8 तारखेला येणार आहे. त्यावेळीच दिल्लीत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्लीत 70 जागांसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
दिल्लीत 17,766 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीमध्ये सुमारे 1 कोटी 56 लाख मतदार मतदान करण्यास पात्र असल्याचे समजते आहे. त्यामुळे 8 तारखेला मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे ते स्पष्ट होणार आहे. मात्र 2020 पेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे म्हटले जात आहे. काही जागांवर अजूनही मतदान सुरू आहे. त्यामुळे अंतिम टक्केवारी येणे बाकी आहे.
आम आदमी पक्ष, भाजप , कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष आपण केलेल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर कॉँग्रेस आणि भाजप सत्ता परिवर्तन करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत.
‘आप’-भाजपमध्ये ‘कांटे की टक्कर’
दिल्लीच्या निवडणुकीत कोणते मुद्दे निर्णायक ठरणार हे जाणून घेऊयात.
मतदानाची टक्केवारी
दिल्लीत 2015 मध्ये 67.13 टक्के तर 2020 मध्ये 62. 59 टक्के मतदान झाले हते. दोन्ही वेळेस मतदान हे शनिवारी झाले होते. काही प्रमाणात मतदान कमी झाले असल्याची चर्चा होती. यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदानांची टक्केवारी वाढल्यास कोणाला फायदा होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
विभाजित मतदान पद्धत
2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतांचे विभाजन पद्धती पहायला मिळाली. म्हणजेच मतदारांनी लोकसभेत एका पक्षाला तर विधानसभेत दुसऱ्या पक्षाला मतदान केले होते. कोणती निवडणूक आहे त्यावरून मतदान करतात असे दिसून आले आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेले मतदार देखील असतात. दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या बाजूने मतदान करणारे मतदार आहेत.
चेहरा
प्रत्येक निवडणुकीत त्या-त्या पक्षाचा चेहरा कोण असणार यावर देखील निवडणुकीचा निकाल अपेक्षित असतो. आम आदमी पक्षाकडे अरविंद केजरीवाल तर भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक दोघांसाठी महत्वाची समजली जात आहे.
पक्षाचे कार्यकर्ते
प्रत्येक निवडणुकीत मिळणारे यश हे त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भाजपने हरयाणा आणि महाराष्ट्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. दिल्ली विधानसभेसाठी देखील संघाने अविरत मेहनत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. भाजपने 50 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र त्यांच्यासमोर असणारे आम आदमी पक्षाचे आव्हान देखील तितकेच तगडे असणार आहे.