Delhi assembly elections 2025 result date schedule announced next week by election commission aap vs bjp
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत. प्रचार सभांचा जोर वाढला असून टीका टिप्पणी केली जात आहे. प्रचार सभांमध्ये भाजप विरोधी आम आदमी पक्ष अशी चुरशीची लढत दिसून येत आहे. अरविंद केजरीवास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. यामध्ये आता दिल्ली विधानसभा निवडणूकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशभरातून दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे लक्षात लागले आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष तिसऱ्यांदा हॅट ट्रीक करण्यास यशस्वी होणार का? य़ाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय निवडणूक आयोग 7 किंवा 8 जानेवारीला दिल्ली निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. दिल्लीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होणार असून 15 फेब्रुवारीनंतर निकाल लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की महाराष्ट्राप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणूक देखील एकाच टप्प्यामध्ये घेतली जाणार आहेत. दिल्लीमध्ये 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी एकाच टप्प्यामध्ये संपणार आहे. तसेच यानंतर 15 किंवा 16 फेब्रुवारीला मतमोजणी होऊ शकते. अशा स्थितीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र राजकारणासंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिवराज सिंह चौहान यांच्या पत्रावरुन राजकारण
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंगत आलेली आहे. प्रचारामध्ये टीका टिप्पणी तर होतच आहे. पण, त्याचबरोबर दिल्लीचे राजकारण लेटर बॉम्बने गाजले आहे. देशाची राजधानी सर करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधली आहे. दिल्लीच्या राजकारणातील पत्रयुद्धात एलजी व्हीके सक्सेना आणि दिल्लीच्या सीएम आतिशी मार्लेना यांनी एकमेकांवर लेटर बॉम्ब फोडले आहेत. या वादामध्ये आता शिवराज सिंह चौहान यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांच्या पत्राने राजकीय खळबळ उडाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नवीन वर्षाच्या राजकीय पत्राला दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी प्रथम उत्तर दिले. शेतकऱ्यांबद्दल भाजपची चिंता दाऊद इब्राहिमने अहिंसेचे प्रवचन दिल्यासारखी असल्याचे आतिशी यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे. अखेरीस केजरीवाल यांनीही या लढाईत उडी घेतली आणि भाजपला शिव्याशाप दिला. यामुळे दिल्लीचे राजकारण जोरदार रंगले आहे. यामध्ये आता लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे.