नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली गेली. सिसोदिया हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. त्यानंतर आज सीबीआयने ही कारवाई केली आहे.
आज फिर CBI जा रहा हूँ, सारी जाँच में पूरा सहयोग करूँगा. लाखों बच्चो का प्यार व करोड़ो देशवासियो का आशीर्वाद साथ है
कुछ महीने जेल में भी रहना पड़े तो परवाह नहीं. भगत सिंह के अनुयायी हैं, देश के लिए भगत सिंह फाँसी पर चढ़ गए थे. ऐसे झूठे आरोपों की वजह से जेल जाना तो छोटी सी चीज़ है— Manish Sisodia (@msisodia) February 26, 2023
मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांची चौकशी केली. या चौकशीसाठी ते सकाळी 11.10 वाजता दिल्लीतील सीबीआयच्या मुख्य कार्यालयात पोहोचले होते. चौकशीला सामोरे जाण्याआधी ते आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह राजघाटावर पूजा करण्यासाठी गेले होते. मनीष सिसोदिया हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. ईडी, सीबीआयकडून सिसोदिया यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचे पोस्टर आपने जारी केले होते. दोन पानांच्या या पोस्टरवर मनीष सिसोदिया यांचा फोटोही छापण्यात आला होता. खोट्या गुन्ह्यांची आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती नाही. आम्ही भगतसिंह आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आम्ही मृत्यूशी सामना करायलाच निघालोय, असं सिसोदियांनी म्हटलं होतं.