Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Elections: कथित हल्ला प्रकरणावर केजरीवाल यांची आक्रमक भूमिका; म्हणाले, “माझे जीवन…”

केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, लाल बहादूर सदनमध्ये अरविंद केजरीवाल यांची जाहीर सभा होती, भाजपचे काही लोक सभेला आले होते ज्यांना प्रश्न विचारायचे होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 19, 2025 | 10:02 PM
Delhi Assembly Elections: कथित हल्ला प्रकरणावर केजरीवाल यांची आक्रमक भूमिका; म्हणाले, "माझे जीवन..."

Delhi Assembly Elections: कथित हल्ला प्रकरणावर केजरीवाल यांची आक्रमक भूमिका; म्हणाले, "माझे जीवन..."

Follow Us
Follow Us:

Arvind Kejriwal: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दिल्लीमध्ये तिरंगी लढत होणार असून सर्व देशभरातून निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यासाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निवडणुकीपूर्वी हल्ला झाला आहे. आम आदमी पक्षाने एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यावर आता माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी हल्ला झाला आहे. त्यावर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “माझे जीवन देशासाठी समर्पित आहे. मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. “आम आदमी पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करून नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार परवेश वर्मा यांच्यावर आरोप केले आहेत.

पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, “निवडणुकीदरम्यान दिल्लीतील जनतेने असा प्रचार आणि हिंसाचार कधीही पाहिला नव्हता. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपचा हा प्रचार करण्याचा मार्ग आहे कारण त्यांना माहिती आहे ते हरत आहेत. मी नवी दिल्लीची जागा 20 हजार मतांनी हारणार असल्याचा हा वर्मा यांचा दावा हास्यास्पद आहे.”

हेही वाचा: Delhi Assembly Elections: प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक, ‘आप’ने भाजपवर केला आरोप, पाहा VIDEO

नेमके प्रकरण काय?

 

आम आदमी पक्षाने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले की, ‘भाजप पराभवाला घाबरला, अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांच्या गुंडांनी हल्ला केला!’ भाजप उमेदवार प्रवेश वर्मा प्रचार करत असताना, भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला केला आणि त्यांना प्रचार करू नये म्हणून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला. भाजपवाल्यांनो, केजरीवालजी तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीचे लोक तुम्हाला योग्य उत्तर देतील.

सवाल पूछती जनता पर @ArvindKejriwal ने अपनी गाड़ी से 2 युवाओं को मारी टक्कर ।दोनों को लेडी हार्डिंग हॉस्पिटल ले कर गए हैं । हार सामने देखकर लोगों की जान की क़ीमत ही भूल गए ।
मैं हॉस्पिटल जा रहा हूँ । pic.twitter.com/IntWoqMCDP
— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) January 18, 2025

भाजपचे प्रत्युत्तर 

दरम्यान, भाजपने प्रत्युत्तर देत आम आदमी पक्षावरवर हल्ला चढवला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा म्हणाले की, केजरीवाल यांच्या काळ्या कारने आमच्या कार्यकर्त्यांना चिरडले. आमच्या एका कार्यकर्त्यांचा पाय तुटला आहे आणि मी त्यांना भेटण्यासाठी लेडी हार्डिंगकडे जात आहे. प्रवेश वर्मा म्हणाले की, गेल्या ११ वर्षांपासून दिल्लीत चालणाऱ्या सरकारने दिल्लीत भ्रष्टाचार पसरवलाच नाही तर दिल्लीलाही उद्ध्वस्त केले आहे. आज मी देशवासीयांना आणि दिल्लीतील जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे की तुम्हाला दिल्ली वाचवावी लागेल, ११ वर्षांत यमुना केवळ घाण झाली नाही तर ती नाल्यासारखी झाली आहे.

हेही वाचा: Delhi Assembly Elections : अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज होणार बाद? दिल्लीच्या राजकारणात आला नवीन ट्वीस्ट


केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, लाल बहादूर सदनमध्ये अरविंद केजरीवाल यांची जाहीर सभा होती, भाजपचे काही लोक सभेला आले होते ज्यांना प्रश्न विचारायचे होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. 

Web Title: Delhi former cm arvind kejriwal reply after attempt to attack delhi assembly election 2025 bjp news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • BJP
  • delhi

संबंधित बातम्या

George Kurian Resignation : मोदी सरकारला धक्का! केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा, राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी
1

George Kurian Resignation : मोदी सरकारला धक्का! केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा, राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी

Solapur MLC Election : ‘डीसीसी बँक बुडवणाऱ्यांनीच निवडणूक लादली’; विजयीनंतर राजेंद्र राऊतांचा मोहिते-पाटील गटावर हल्लाबोल
2

Solapur MLC Election : ‘डीसीसी बँक बुडवणाऱ्यांनीच निवडणूक लादली’; विजयीनंतर राजेंद्र राऊतांचा मोहिते-पाटील गटावर हल्लाबोल

MLC Election Result 2026 : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; बसवराज पाटील 719 मतांनी विजयी
3

MLC Election Result 2026 : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; बसवराज पाटील 719 मतांनी विजयी

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका,  छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी
4

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.