Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur MLC Election : ‘डीसीसी बँक बुडवणाऱ्यांनीच निवडणूक लादली’; विजयीनंतर राजेंद्र राऊतांचा मोहिते-पाटील गटावर हल्लाबोल

सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत यांनी मोहिते-पाटील गटावर जोरदार टीका केली. डीसीसी बँक आणि दूध संघ अडचणीत आणणाऱ्यांनीच अहंकारातून ही निवडणूक लादल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 22, 2026 | 02:47 PM
'डीसीसी बँक बुडवणाऱ्यांनीच निवडणूक लादली'; विजयीनंतर राजेंद्र राऊतांचा मोहिते-पाटील गटावर हल्लाबोल

'डीसीसी बँक बुडवणाऱ्यांनीच निवडणूक लादली'; विजयीनंतर राजेंद्र राऊतांचा मोहिते-पाटील गटावर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • डीसीसी बँक, दूध संघ बुडवणाऱ्यांनीच निवडणूक लादली
  • आता अकलूजमध्येच हिशोब मांडणार
  • विजयानंतर राजेंद्र राऊत यांचा मोहिते-पाटलांवर जोरदार हल्लाबोल
  • अदृश्य शक्ती’ हरली, भाजप जिंकला
  • जयकुमार गोरे यांच्या रणनीतीने मोहिते-पाटील गारद.
शिवाजी हळणवर, पंढरपूर : सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर राऊत यांनी निवडणूक काळातील आरोपांना सडेतोड उत्तर देताना मोहिते-पाटलांवर निशाणा साधला. ‘ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जिल्ह्यातील अनेक नेत्यांची अपेक्षा होती. मात्र मला त्यांच्या दारात जाऊन मतांची याचना करावी, नमस्कार घालावा अशी काहींची अपेक्षा होती. आता ते दिवस गेले आहेत. लोकशाहीत प्रत्येक मतदार समान आहे, असे ते म्हणाले.

ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसी) बुडवली, दूध संघ अडचणीत आणला, त्यांनीच स्वतःच्या अहंकारातून ही निवडणूक लादली. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा बळी देत त्यांनी प्रतिष्ठेची लढाई उभी केली,अशा शब्दांत नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य राजेंद्र राऊत यांनी मोहिते-पाटील गटावर जोरदार टीका केली.

Satara News: कोट्यवधींचा भुयारी मार्ग तयार, पण उद्घाटनाअभावी बंद; मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी

राऊत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी समन्वय ठेवत होतो. मात्र मोहिते-पाटील यांनी मुद्दाम निवडणूक डीसीसी बँकेच्या मुद्द्यावर नेली. आज त्यांच्याकडे सुमारे ६०० कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर बार्शीचे सोपल यांच्याकडेही ३०० कोटीची थकबाकी आहे. परंतु तत्कालीन संचालक मंडळातील अनेक सदस्य आज माझ्या सोबत आहेत. अनगरचे राजन पाटील, बबनराव शिंदे, संजय शिंदे यांच्याकडे असणारी कर्ज त्यांनी परतफेड केली आहे. प्रशांतराव परिचारक यांच्याकडे तर कर्जाचा विषयच नाही आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू यांच्याकडेही कर्ज नाही.तरीही निवडणुकीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.

अधिवेशनानंतर अकलूजमध्ये जंगी सभा

निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या शब्दाची आठवण करून देताना राऊत म्हणाले, मोहिते-पाटलांना त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन उत्तर देणार, असे मी जाहीर केले होते. अधिवेशन संपल्यानंतर अकलूजमध्ये भव्य सभा घेऊन सर्व मुद्द्यांवर खुलासा करणार आहे. या विधानातून त्यांनी पुन्हा एकदा मोहिते-पाटील गटाला थेट आव्हान दिले.

‘दूध पंढरी’ संघ पुन्हा सुरू करणार

शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद पडलेला ‘दूध पंढरी’ सहकारी दूध संघ पुन्हा सुरू करण्याचा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला. पूर्वीच्या नेत्यांनी उभारलेल्या या संस्थेला मोहिते-पाटील यांच्या काळात उतरती कळा लागली. आता हा संघ पुन्हा उभा करून शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे त्यांनी सांगितले.

३६५ मतांची दणदणीत आघाडी

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांनी ४८३ मते मिळवत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना ११८ मते मिळाली. राऊत यांनी तब्बल ३६५ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. ६१६ मतदारांपैकी ६१४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते-पाटील प्रतिष्ठेची लढत

या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा होती. मोहिते-पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रचार मोहीम राबवत भाजपला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यास भाग पाडले. मात्र निकालाने भाजपची संघटनात्मक ताकद आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्यातील वाढते वर्चस्व अधोरेखित झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषदेवरील एकहाती सत्ता मिळवल्यानंतर विधान परिषदेतही भाजपचा झेंडा फडकवण्यात जयकुमार गोरे यांना यश आले. या निकालामुळे मोहिते-पाटील गटाला मोठा धक्का बसला असून जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व आणखी मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

घाटकोपर दुर्घटनेतून महापालिका काय शिकली? पश्चिम द्रुतगती महामार्गावर ‘डिजिटल’ होर्डिंगमुळे अपघात घडण्याची चालकांना भीती

Web Title: Rajendra raut slams mohite patil group after solapur mlc election victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक
1

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक

Deepak Mhaskey News BJP IT Cell Chief: भाजप आयटी सेलमध्ये मोठा बदल; दीपक म्हस्के नवे आयटी सेल प्रमुखपदी नियुक्ती
2

Deepak Mhaskey News BJP IT Cell Chief: भाजप आयटी सेलमध्ये मोठा बदल; दीपक म्हस्के नवे आयटी सेल प्रमुखपदी नियुक्ती

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत पंतप्रधान मोदींशी भेट, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
3

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत पंतप्रधान मोदींशी भेट, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन
4

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.