Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! दिल्लीत इंटरनेट सेवा आणि मेट्रोची 16 स्थानके बंद, 3 स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा कायम

दिल्लीतील वाढीव सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने 16 मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि निर्गमन तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरिएट या तीन स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा पूर्ववत सुरू ठेवण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2026 | 12:26 PM
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! दिल्लीत इंटरनेट सेवा आणि मेट्रोची 16 स्थानके बंद, तीन स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा कायम

प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! दिल्लीत इंटरनेट सेवा आणि मेट्रोची 16 स्थानके बंद, तीन स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा कायम

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत इंटरनेट सेवा आणि मेट्रोची 16 स्थानके बंद
  • तीन स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा कायम
  • दिल्लीत इंटरनेट सेवा बंद
Delhi Metro Stations Closed: नीट परीक्षेच्या पेपरफुटीविरोधातील सुरू असलेले आंदोलन निर्णायक वळण घेत असल्याचे दिसत आहे. गेल्या २६ दिवसांपासून उपोषणावर असलेले कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवून आधी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आणि नंतर गुरुग्राममधील मेदांतासारख्या खासगी रुग्णालयात दाखल केल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने, दिल्ली मेट्रोने गुरुवारी (23 जुलै 2026) सकाळी ७:३० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत १६ स्थानके बंद केली आहेत. दिल्ली मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट येथे इंटरचेंजची सुविधा उपलब्ध असणार आहे, अशी माहिती दिली.

राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे की, लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरीएट, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम येथील स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत.

CJP Protest: दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस भवनसमोर निदर्शने

यापूर्वी बुधवारी, सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोची १६ स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली होती. तथापि, राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घोषणा केली की, लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरीएट, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम ही मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील.

रविवारी, सुरक्षेच्या कारणास्तव जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि सेवा तीर्थ ही मेट्रो स्थानकेही पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. तथापि, काही वेळाने राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटरीएट स्थानकांवरील इंटरचेंज सुविधा पूर्ववत करण्यात आल्या आणि त्यांची प्रवेशद्वारे पुन्हा उघडण्यात आली. दरम्यान, सरन्यायाधीशांच्या संसदेकडे जाणाऱ्या मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या घटनांच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी १० एफआयआर नोंदवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान घडलेल्या विविध घटनांच्या संबंधात हे गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास सुरू आहे.

Sonu Nigam: ‘शी… अशा कलाकारांना लाज वाटली पाहिजे’; विद्यार्थी आंदोलनावर सोनू निगमचं वक्तव्य चर्चेत; सोशल मीडियावर संतापाची लाट

Web Title: Delhi metro closes 16 stations security reasons three interchange stations open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • delhi
  • Delhi Metro

संबंधित बातम्या

CJP Protest News: जंतर-मंतरवरील राड्यानंतर दिल्लीत कडक निर्बंध; अभिजीत दिपकेंचा थेट हल्ला
1

CJP Protest News: जंतर-मंतरवरील राड्यानंतर दिल्लीत कडक निर्बंध; अभिजीत दिपकेंचा थेट हल्ला

CJP Protest: दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस भवनसमोर निदर्शने
2

CJP Protest: दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस भवनसमोर निदर्शने

Protest Day 34: जंतरमंतरवरील रात्रीच्या राड्यानंतर आता कशी आहे परिस्थिती? रात्री नेमकं काय घडलं?
3

Protest Day 34: जंतरमंतरवरील रात्रीच्या राड्यानंतर आता कशी आहे परिस्थिती? रात्री नेमकं काय घडलं?

Sonu Nigam: ‘शी… अशा कलाकारांना लाज वाटली पाहिजे’; विद्यार्थी आंदोलनावर सोनू निगमचं वक्तव्य चर्चेत; सोशल मीडियावर संतापाची लाट
4

Sonu Nigam: ‘शी… अशा कलाकारांना लाज वाटली पाहिजे’; विद्यार्थी आंदोलनावर सोनू निगमचं वक्तव्य चर्चेत; सोशल मीडियावर संतापाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.