Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी

CJP Leaders Breach Jantar Mantar: कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) सोमवारी, येत्या काही दिवसांत राजस्थानमध्ये आंदोलने करण्याची घोषणा केली आहे. राजस्थानमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि काहींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 13, 2026 | 04:05 PM
CJP, Jantar Mantar, Delhi Police, Gyanesh Kumar, Abhijeet Dipke,

CJP, Jantar Mantar, Delhi Police, Gyanesh Kumar, Abhijeet Dipke,

Follow Us
Follow Us:
  • जंतरमंतरवर आंदोलनाला बंदी असतानाही सीजेपी नेत्यांचा पोलिसांना चकवा देऊन आत प्रवेश
  • आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी बॅरिकेड्स ओलांडून जंतरमंतरवर फडकवला तिरंगा
  • “ज्ञानू, तुझा खेळ संपला!”; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात जोरदार घोषणाबाजी
CJP Leaders Breach Jantar Mantar: मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ( CJP) आंदोलनामुळे देशभरात आंदोलनाचे लोण पसरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारची डोकेदुखीही चांगलीच वाढली आहे. सीजेपीच्या दिल्लीत १० ऑक्टोबरला झालेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने जंतरमंतर मैदान आंदोलनस्थळ म्हणून रद्द करत असल्याची घोषणा केली. पण त्यानंतर आज सीजेपीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना चकवा देत जंतरमंतरवर दाखल झाले आणि ज्ञानेश कुमारांविरोधात घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

जंतरमंतर आंदोलनासाठी बंद झाल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह पोलिसांना हुलकावणी देत आज जंतर मंतरचे दरवाजे आणि बॅरिकेड्स ओलांडून आत प्रवेश केला. जंतरमंतरवर प्रवेश करताच तरुणांनी तिरंगा झेंडा फडकावत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर काही पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतले.

CJP Protest : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून कॉकरोच जनता पार्टी आक्रमक, मुंबईत आंदोलनाची घोषणा

आशुतोष रांका यांनी पोस्ट केले की, जंतर मंतरच्या किल्ल्याभोवतीचा सुरक्षा घेरा भेदण्यात आला. आम्ही जंतर मंतरमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी आता आम्हाला ताब्यात घेतलं आहे. हा आपल्या सर्व तरुणांसाठी एक संदेश आहे की आपण हे करू शकतो. त्यांनी पुढे लिहिले, “ज्ञानू, तुझा खेळ आता संपला आहे.” असा सूचक इशाराही आशुतोष रांका यांनी दिला आहे.

जंतर मंतरवर तिरंगा फडकवला

मंगळवारी सकाळी गेटवरून उडी मारून जंतर मंतरमध्ये प्रवेश केलेल्या सीजेपीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तिरंगा फडकवत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आंदोलनादरम्यान त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सीजेपी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीदरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या दिल्ली पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले.

सीजेपी संस्थापक अभिजित दीपके यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचे कौतुक केले. तसेच, दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनांवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर त्यांनी टीकाही केली.

CJP Warning Dnyanesh Kumar: “सरफ़रोशी की तमन्ना…” CJP आक्रमक; SIR आणि मतदार यादी गैरप्रकारावरून थेट संघर्षाची तयारी

आम्ही पुन्हा जंतर मंतर ताब्यात घेतले

कॉकरोच जनता पक्षाचे सह-संयोजक सौरभ दास म्हणाले, “आम्ही पुन्हा जंतर मंतर ताब्यात घेतले! आम्ही जंतर मंतरमध्ये शिरलो आणि आता आम्हाला ताब्यात घेतले जात आहे. पण हा आपल्या सर्व तरुणांसाठी एक संदेश आहे की आम्ही हे करू शकतो! ज्ञानू, तुझा खेळ आता संपला आहे, भावा!”

कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) सोमवारी, येत्या काही दिवसांत राजस्थानमध्ये आंदोलने करण्याची घोषणा केली आहे. राजस्थानमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि काहींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यासोबतच, दिल्लीतील अलीकडील आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या, महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि पत्रकारांच्या अटकेच्या आणि त्यांच्यावर झालेल्या कथित पोलीस अत्याचारांच्या निषेधार्थ हे निदर्शन आयोजित केले जाईल.

दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक लोकांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांपैकी तिघांनी असा आरोप केला आहे की, त्यांना आणि बसमधून नजरबंदी केंद्रांमध्ये नेण्यात आलेल्या इतरांना तिथे मारहाण करण्यात आली. ही केंद्रे तात्पुरत्या सुविधा म्हणून उभारण्यात आली होती. वैद्यकीय नोंदींनुसार, किरकोळ जखमा आणि ओरखड्यांपासून ते एका व्यक्तीच्या उजव्या कोपराच्या फ्रॅक्चरपर्यंतच्या जखमांचा तपशील आहे.

 

 

Web Title: Cjp leaders breach jantar mantar security unfurl tricolour delhi protests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • abhijit dipke
  • CJP
  • Delhi Police
  • Gyanesh Kumar
  • Jantar Mantar

संबंधित बातम्या

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश
1

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश

Jantar-Mantar protest: विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?; जंतरमंतर आंदोलनाच्या यादीतून बाहेर, दिल्लीत वाद पेटला
2

Jantar-Mantar protest: विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?; जंतरमंतर आंदोलनाच्या यादीतून बाहेर, दिल्लीत वाद पेटला

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला
3

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला

New Delhi : आता जंतर-मंतर नाही, तर ‘या’ ठिकाणी करावं लागणारं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
4

New Delhi : आता जंतर-मंतर नाही, तर ‘या’ ठिकाणी करावं लागणारं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.