राहुल गांधींच्या दिल्ली विद्यापीठ भेटीवरून वाद, विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाईचा इशारा
राहुल गांधी यांच्या दिल्ली विद्यापीठाच्या भेटीवरून गोंधळ सुरू झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी या भेटीची पूर्व माहिती दिलेली नसून प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं आहे. तर एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांवरही गैरवर्तनाचा आरोप केला जात आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच भविष्यात अशी चूक न करण्याचा इशारा दिला आहे. डीयूएसयू अध्यक्षांनी मात्र विद्यापीठ प्रशासनाचे आरोपांचं खंडन केलं आहे.
PM Modi Speech : माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर वाहतोय! बिकानेरमधून PM मोदी कडाडले
राहुल गांधी यांनी एनएसयूआय अध्यक्षांच्या कार्यालयाला भेट दिली. एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. या दरम्यान त्यांनी आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. दिल्ली विद्यापीठाने याला प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एबीव्हीपीनेही यावर टीका केली आहे. दुसरीकडे, एनएसयूआयने म्हटलं आहे की, विद्यार्थी संघटना आणि डीयू प्रशासन काँग्रेस खासदारांच्या भेटीवर राजकारण करत आहेत.
DUSU चे अध्यक्ष रौनक खत्री यांनी या वादाला उत्तर देताना म्हटले आहे की, विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांना खासगी पाहुण्यांना भेटण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागते असा कोणताही नियम नाही. राहुल गांधींच्या भेटीदरम्यान कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन करण्यात आलेले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Priyanka Gandhi : देशभक्तीचा खरा अर्थ कोणी शिकवला? प्रियांका गांधींची ती भावनिक पोस्ट चर्चेत
अभाविपच्या विद्यार्थ्यांनी या भेटीला विरोध केला आहे, राहुल गांधींच्या भेटीमुळे सचिवांना त्यांच्या खोलीत जाऊ दिलं गेलं नाही. काही विद्यार्थ्यांना जबरदस्तीने सचिवांच्या खोलीत बंद करण्यात आलं. NSUI च्या कार्यकर्त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केलं आहे. दुसरीकडे, विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे की माहितीशिवाय भेट देणे हे शिष्टाचाराचं उल्लंघन आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी संघटनेचे कामकाज विस्कळीत झालं होतं. भविष्यात ते याची काळजी घेतील अशी आशा आहे, असं म्हटलं आहे.