Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: मतचोरीच्या तक्रारीसाठी थेट बेससाईट आणि मिस्ड कॉल नंबर..; राहुल गांधींची निवडणूक आयोगासोबत आता आरपारची लढाई

राहुल गांधी यांनी “ही लढाई लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे” असे आवाहन करताच, सोशल मीडियावर त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या पोस्टखाली अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये समर्थनाचे प्रमाणपत्र शेअर केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 10, 2025 | 04:26 PM
Rahul Gandhi News: मतचोरीच्या तक्रारीसाठी थेट बेससाईट आणि मिस्ड कॉल नंबर..; राहुल गांधींची निवडणूक आयोगासोबत आता आरपारची लढाई
Follow Us
Close
Follow Us:
  • राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने घोषणापत्र/शपथपत्र सादर करण्याचे किंवा माफी मागण्याचे आव्हान
  • राहुल गांधींनी सोशल मीडियावरून जनतेला स्वच्छ व पारदर्शक मतदार यादीसाठी समर्थन करण्याचे आवाहन
  • डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करून सर्वांनी ऑडिट करण्याची मागणी
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांनानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नियमांनुसार स्पष्ट घोषणापत्र आणि शपथपत्र सादर करावे किंवा त्यांच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आरोपांसाठी सार्वजनिकरित्या देशाची माफी मागावी, असे आव्हान केलं आहे. त्याच वेळी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला थेट भिडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (१० ऑगस्ट २०२५) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत मतचोरीवरून थेट जनतेलाच आवाहन केलं आहे. “मत चोरी हा ‘एक व्यक्ती, एक मत’ या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.

Bangladesh General election 2026 : बांगलादेशमध्ये उडणार निवडणुकीचा धुराळा; निवडणूक आयोग करणार मतदानाची तारीख

राहुल गांधी म्हणाले की, “निवडणूक आयोगाकडे आमची मागणी स्पष्ट आहे, पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः त्याचे ऑडिट करू शकतील. तुम्हीही आमच्यात सामील होऊन या मागणीला पाठिंबा देऊ शकता – http://votechori.in/ecdemand ला भेट द्या किंवा 9650003420 वर मिस्ड कॉल द्या. ही लढाई लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे.” असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमुद केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

नेत्यांनी तथ्ये आणि पुराव्यांसह विधाने करावीत – ECI

राहुल गांधी यांनी अलिकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोगाने ( Election Commission of India)  यावर तीव्र आक्षेप व्यक्त करत म्हटले की, ‘राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला होता, तर २०१८ मध्ये या प्रकरणात आधीच कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मते, काँग्रेस नेत्याने केलेले आरोप तथ्यांवर आधारित नाहीत आणि आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यासाठी नेत्यांनी तथ्ये आणि पुराव्यांसह विधाने करावीत असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Bihar SIR: राहुल गांधींच्या आरोपानंतर बिहार निवडणुकीबाबत मोठ्या हालचाली; आयोगाची सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती

दरम्यान, राहुल गांधी यांनी “ही लढाई लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे” असे आवाहन करताच, सोशल मीडियावर त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या पोस्टखाली अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये समर्थनाचे प्रमाणपत्र शेअर केले आहे. प्रतीक पाटील यांनी लिहिले, “मी प्रतीक पाटील आहे, #VoteChori विरुद्ध. मी राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाकडून डिजिटल मतदार यादीच्या मागणीला पाठिंबा देतो.”

मोहम्मद शादाब खान यांनीदेखील आपले प्रमाणपत्र शेअर करून लिहिले, “मी मोहम्मद शादाब खान आहे, #VoteChori विरुद्ध. मी राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाकडून डिजिटल मतदार यादीच्या मागणीला पाठिंबा देतो.” तसेच, एका व्यक्तीने राहुल गांधींच्या पोस्टमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला पाठिंबा नोंदवला आणि कमेंट बॉक्समधील स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, “मी तुम्हाला पाठिंबा देतो सर.”

 

Web Title: Direct base site and missed call number for vote rigging complaints rahul gandhis battle with the election commission is now on the rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले
1

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार
2

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा
3

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात
4

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.