"Pakistan has not filled bangles", Farooq Abdullah's controversial statement
नवी दिल्ली – जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फ्रंसचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी भगवान श्रीरामांविषयी महत्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले – भगवान राम सर्वांचे आहेत. ते केवळ हिंदू धर्मियांचे नाहीत. फारुक शनिवारी अखनूरमधील एका कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले होते.
यावेळी ते म्हणाले – कोणताही धर्म वाईट नसतो. व्यक्ती भ्रष्ट असतो. भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले की, ते निवडणुकीतच हिंदू धोक्यात असल्याचा नारा देतात. पण एरवी कुणाला विचारतही नाहीत. त्यामुळे जनतेने भाजपच्या थापांना बळी पडू नये.
ते म्हणाले – आम्हाला येथे ५० हजारांच्या नोकऱ्यांची ग्वाही दिली होती. ते कुठे आहे? आमचे डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ व आमची सर्वच मुले बेरोजगार आहेत. हे एका राज्यपालाच्या माध्यमातून करता येत नाही. तुम्ही त्याला उत्तरदायी ठरवू शकत नाही. येथे निवडणूक घेण्याची गरज आहे.
फारुख भारताच्या फाळणीचा उल्लेख करत म्हणाले की, १९४७ साली काश्मीरवर आदिवासींनी हल्ला केला तेव्हा जिन्ना यांनी माझे वडील शेख अब्दुल्लांपुढे जम्मू काश्मीर पाकिस्तानात विलिन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण त्यांनी स्पष्ट नकार देऊन भारताची निवड केली. फारुख म्हणाले – पाकची विद्यमान स्थिती पाहून आम्हाला त्याचा आनंद वाटतो. तेथील माजी पंतप्रधान इम्रान खान यांना गोळी घालण्यात आली. जनतेऐवजी लष्कराच्या हातात सत्ता आहे. याऊलट भारतात सर्वसामान्य नागरिकांच्या हातात ताकद आहे.