अयोध्या – देशभरात दिवाळी साजरी होत आहे. त्यामुळं कोरोनाच्या संकटानंतर आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं देशात कोरोनाच्या दोन वर्षानंतर सण, उत्सव साजरे होत आहेत. दरम्यान, देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. लहान-थोरांची दिवाळी साजरी होत आहे. अंधारमय परिस्थितीवर प्रकाशाची तेजोमय वाटचाल म्हणजे दिवाळी…लख्खं दिव्यांची रोषणाईनं जीवन प्रकाशमय करुन टाकते ती दिवाळी.
[read_also content=”उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांवर बेगडी प्रेम, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/radhakrishna-vikhe-patil-criticism-to-udhav-thackeray-338780.html”]
दरम्यान, दिवाळी देशभरात साजरी होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवाळी साजरी केली आहे. आज अयोध्यातील शरयू घाटावर विक्रमी १५ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. यामुळं शरयू घाट दिव्यांनी उजळून निघाला आहे. श्री रामाचे दर्शना घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. शरयू घाटावर विक्रमी १५ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळं सध्या शरयू घाटाला विशेष महत्व आलं आहे. शरयू घाटावर याआधी एवढी दिव्यांची रोषणाई कधी करण्यात आली नव्हती. मात्र आता विक्रमी १५ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळं नयनरम्य, डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी रोषणाई दिसत आहे.