मतदान कार्ड काढणे झाले आणखी सोपे! आता घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज (Photo Credit- X)
मतदान कार्डाची प्रक्रिया सोपी
तुम्ही १८ वर्षे पूर्ण केली असतील किंवा तुमचे नाव अद्याप मतदार यादीत नसेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. भारत निवडणूक आयोगाने (ECI) मतदान कार्डाची प्रक्रिया पूर्णपणे बदलली असून आता आधार आधारित ‘ई-साइन’ (e-Sign) पद्धत अनिवार्य केली आहे. यामुळे बनावट अर्जांना चाप बसणार असून प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.
काय आहे ‘ई-साइन’ पद्धत?
पूर्वी अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होण्यास वेळ लागायचा. आता नवीन पोर्टलवर अर्ज सादर करताना शेवटी तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी टाकून तुम्ही तुमच्या अर्जावर ‘डिजिटल स्वाक्षरी’ (e-Sign) करू शकता. यामुळे कोणत्याही फिजिकल सहीची किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही.
नव्याने नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे:
फोटो: अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो (2MB पेक्षा कमी).
वयाचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जन्म दाखला.
पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, बँकेचे पासबुक, वीज बिल किंवा रेशन कार्ड.
असा करा ऑनलाईन अर्ज (स्टेप-बाय-स्टेप):
१. पोर्टलवर नोंदणी करा
सर्वात आधी voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. जर तुमचे खाते नसेल, तर ‘Sign Up’ वर क्लिक करून मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून रजिस्ट्रेशन करा.
२. फॉर्म ६ (Form 6) भरा
लॉगिन केल्यानंतर ‘New Voter Registration’ या पर्यायावर क्लिक करून ‘Form 6’ निवडा. यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ अचूक निवडा.
३. वैयक्तिक माहिती
तुमचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव आणि पत्ता मराठी व इंग्रजीमध्ये भरा. तुमचा फोटो आणि रहिवासी पुरावा (उदा. आधार कार्ड) पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
४. आधार आणि ई-साइन
अर्जामध्ये ‘Aadhar Details’ निवडा आणि तुमचा आधार नंबर भरा. अर्ज सबमिट करण्यापूर्वी शेवटी ‘e-Sign and Submit’ हा पर्याय दिसेल. तिथे आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
५. रेफरन्स नंबर जतन करा
अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक ‘Reference ID’ मिळेल. या नंबरद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस ट्रॅक करू शकता.
मतदान कार्ड कधी आणि कसे मिळेल?
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर बीएलओ (BLO) द्वारे तुमच्या पत्त्याची पडताळणी केली जाईल. साधारण १० ते १५ दिवसांत तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट होईल आणि तुमचे नवीन डिजिटल मतदान कार्ड (EPIC) स्पीड पोस्टाद्वारे थेट तुमच्या घरी पाठवले जाईल. तसेच ही अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
तुमचे जुने मतदान कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका, तुम्ही ‘e-EPIC’ डाऊनलोड करू शकता:






