Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swiggy Instamart ला FSSAI चा दणका; एक्सपायर्ड आणि खराब खाद्यपदार्थांच्या तक्रारींवर 9 नोटिसा

ग्राहकांकडून खराब आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थ पुरवल्याच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) स्विगी इंस्टामार्टविरोधात कारवाई केली आहे. नियमांच्या कथित उल्लंघनाप्रकरणी प्लॅटफॉर्मला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 10:27 AM
Swiggy Instamart ला FSSAI चा दणका; एक्सपायर्ड आणि खराब खाद्यपदार्थांच्या तक्रारींवर 9 नोटिसा

Swiggy Instamart ला FSSAI चा दणका; एक्सपायर्ड आणि खराब खाद्यपदार्थांच्या तक्रारींवर 9 नोटिसा

Follow Us
Follow Us:
  • FSSAI ने Swiggy Instamart ला अन्न सुरक्षा नियमांच्या कथित उल्लंघनाप्रकरणी 9 नोटिसा बजावल्या.
  • खराब, मुदतबाह्य आणि दूषित खाद्यपदार्थ पुरवल्याच्या ग्राहकांच्या तक्रारींनंतर कारवाई करण्यात आली.
  • नियामकाने सविस्तर स्पष्टीकरण आणि नियमपालनाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI ) ‘क्विक कॉमर्स’ प्लॅटफॉर्म ‘स्विगी इंस्टामार्ट’ला नऊ नोटिसा बजावल्या आहेत. या प्लॅटफॉर्मद्वारे खराब झालेले आणि मुदत संपलेले (एक्सपायर्ड) खाद्यपदार्थ पुरवले जात असल्याच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली आहे, असे अन्न सुरक्षा नियामक एफएसएसएआयने शनिवारी सांगितले. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सोशल मीडिया मंचाच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ‘स्विगी इंस्टामार्ट’ला या नऊ नोटिसा बजावण्यात आल्या.

सर्वसामान्यांना दिलासा नाहीच ! पंपांवर आता इथेनॉलमिश्रित पेट्रोलच मिळणार; तीन प्रकारचे पेट्रोल विकण्यास केंद्राचा नकार

ग्राहकांनी ‘स्विगी इंस्टामार्ट’ला द्वारे मुदत संपलेले, खराब झालेले, दूषित आणि इतर प्रकारे असुरक्षित खाद्यपदार्थ पुरवले जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या, असे नियामकाने नमूद केले. एफएसएसएआने या प्लॅटफॉर्मला सविस्तर स्पष्टीकरण आणि नियमांचे पालन केल्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. असे न केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘स्विगी इंस्टामार्ट’ ला हा ऑनलाइन अन्न वितरण कंपनी ‘स्विगी’ चा ‘विवक-कॉमर्स’ विभाग आहे.

तक्रारींचा तपशील देताना एफएसएसएआयने म्हटले आहे की, लहान मुलांच्या एका खाद्यपदार्थाबाबत तक्रार प्राप्त झाली होती, जो अत्यंत खराब आणि असुरक्षित स्थितीत असल्याचे आढळले. त्यात दूषितपणा तसेच अयोग्य साठवणूक आणि हाताळणीची चिन्हे दिसून आली. तो पदार्थ परत केल्यानंतरही, तो कथितरीत्या पुन्हा ग्राहकाला पाठवण्यात आला. ‘स्विगी इंस्टामार्ट’ द्वारे खराब झालेली अंडी आणि दूध, तसेच खराब झालेले पॅकबंद खाद्यपदार्थ पुरवले गेल्याचा आरोपही तक्रारींमध्ये करण्यात आला होता.

राष्ट्रहित सर्वोपरी! AFMC चा दिमाखदार सोहळा; १४१ वैद्यकीय अधिकारी सशस्त्र दलात दाखल

असमाधानकारक प्रतिसाद

एफएसएसएआयच्या मते, तपासादरम्यान असेही आढळून आले की काही प्रकरणामध्ये एफएसएसएआय परवाना क्रमांक चुकीचे, अवैध किंवा अस्तित्वात नसलेले होते. शिवाय, अन्न व्यवसाय हे त्यांच्या एफएसएसएआय नोंदणीमध्ये नमूद केलेल्या नावांपेक्षा वेगळ्या नावांनी सूचीबद्ध केले गेल्याचेही समोर आले. नियामकाने म्हटले आहे की, काही तक्रारींमध्ये असा आरोप करण्यात आला की, प्रकरण वरिष्ठ स्तरावर नेऊनही त्यावर समाधानकारक प्रतिसाद, तक्रार निवारण किवा सुधारणात्मक कारवाई झाली नाही. दरम्यान, एका तक्रारीत असे नमूद केले की, अन्न सुरक्षेच्या मुद्द्यांकडे लक्ष न देता केवळ पैशांचा परतावा देण्याची ऑफर देण्यात आली. एफएसएसएआयच्या मते, या नोटीसामुळे विक्रेत्यांची नोंदणी, नियमांच्या पालनाची पडताळणी, अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण आणि अन्न सुरक्षा प्रणालींची पर्याप्तता यांबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Fssai issues 9 notices to swiggy instamart over expired and spoiled food complaints

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Food Safety
  • FSSAI
  • Swiggy

संबंधित बातम्या

नेहमीची डिलिव्हरी ठरली हृदयस्पर्शी अनुभव: पुण्यातील ग्राहकाने स्विगीच्या महिला डिलिव्हरी पार्टनरला दिली ₹1,000 ची टिप
1

नेहमीची डिलिव्हरी ठरली हृदयस्पर्शी अनुभव: पुण्यातील ग्राहकाने स्विगीच्या महिला डिलिव्हरी पार्टनरला दिली ₹1,000 ची टिप

खराब वस्तू,सडलेली अंडी, मुदत संपलेल्या… ग्राहकांच्या तक्रारींनंतर FSSAI ची Swiggy Instamart ला नोटीस
2

खराब वस्तू,सडलेली अंडी, मुदत संपलेल्या… ग्राहकांच्या तक्रारींनंतर FSSAI ची Swiggy Instamart ला नोटीस

दारू कंपन्यांना ‘FSSAI’ चा मोठा झटका! व्हिस्की, बिअरमध्ये अनधिकृत फ्लेवरचा वापर; अनेक बड्या ब्रँड्सना नोटीस
3

दारू कंपन्यांना ‘FSSAI’ चा मोठा झटका! व्हिस्की, बिअरमध्ये अनधिकृत फ्लेवरचा वापर; अनेक बड्या ब्रँड्सना नोटीस

Swiggy : स्विगीने भारतातील रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांसाठी ‘लेट नाईट ईट्स’ सेवा केली सुरू!
4

Swiggy : स्विगीने भारतातील रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांसाठी ‘लेट नाईट ईट्स’ सेवा केली सुरू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.