Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dabur India : डाबर इंडियाच्या उत्पादनांवर बंदी; मध, तुपासह अनेक वस्तूंचा समावेश, विक्री थांबवण्याचे निर्देश

FSSAI Action On Dabur: एफएसएसएआयने (FSSAI) डाबर इंडियाच्या उत्पादनांवर '१००% शुद्ध' किंवा '१००% नैसर्गिक' असे दावे करण्यावर बंदी घालत, अशा अन्नपदार्थांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 05, 2026 | 03:17 PM
fssai prohibits dabur food products misleading 100 percent claims marathi news

fssai prohibits dabur food products misleading 100 percent claims marathi news

Follow Us
Follow Us:
  • ‘१००%’ दाव्यांवर एफएसएसएआयची बंदी
  • दिशाभूल करणारे दावे आणि नियमांचे उल्लंघन
  • १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) डाबर इंडियावर कठोर कारवाई केली. अन्न नियामकाने कंपनीला ‘१००%’ असल्याचा दावा करणाऱ्या खाद्य उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये ऑरगॅनिक अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, ऑरगॅनिक मध, घरी बनवलेले नारळाचे दूध, तिळाचे तेल आणि गाईचे तूप यांचा समावेश आहे. कंपनीला १५ दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. एफएसएसएआयच्या मते, डाबरचे ‘१००%’ असल्याचा दावा अन्न सुरक्षा आणि मानक (जाहिरात आणि दावे) नियम, २०१८ चे उल्लंघन करतो. कारण हे दावे अस्पष्ट आहेत, त्यांची पडताळणी करता येत नाही आणि त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. नियामकाने असे म्हटले की, कंपनीला यापूर्वीही असे दावे करणे थांबवण्याचे निर्देश देणाऱ्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापूर्वीही केली होती नोटीस जारी एफएसएसएआयने सांगितले, त्यांनी यापूर्वी डाबरला नोटीस बजावून असे दिशाभूल करणारे १००% दावे करणे तत्काळ थांबवण्याचे निर्देश

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Deal: कच्च्या तेलाची टंचाई संपणार! अमेरिका-इराण युद्धविरामाच्या दिशेने पहिले मोठे पाऊल; 60 दिवसांचा ‘हा’ करार मंजूर

कारवाई अहवाल सादर करण्याचे आदेश

एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, एफएसएसएआयने म्हटले की, त्यांनी डाबरला १००% शुद्धतेचे दिशाभूल करणारे दावे असलेल्या सर्व खाद्य उत्पादनांची विक्री तत्काळ थांबवण्याचे आणि १५ दिवसांच्या आत कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. डाबरने आपल्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या उत्पादनांवर १००% नैसर्गिक, १००% शुद्ध, १००% शुद्धतेची हमी, १००% सेंद्रिय, १००% कोवळ्या नारळाचे पाणी असे दावे केले होते.

Dabur Faces FSSAI Heat FSSAI directs to stop selling products carrying 100% claims.@Mvachhrajani with more details on the counter. pic.twitter.com/amuokBldXk — NDTV Profit News (@NDTVProfit) August 4, 2026

credit – social media and Twitter
एफएसएसएआयने आरोप केला की, डाबर हिमालयन ऑरगॅनिक ऍपल सायडर व्हिनेगर आणि डाबर ऑरगॅनिक मघावर ‘ऑरगॅनिक इंडिया’चा लोगो वापरण्यात आला होता, जे अन्न सुरक्षा आणि मानके (सेंद्रिय अन्न) विनियम, २०१७ चे उल्लंघन आहे. नियामकाने म्हटले आहे की, ही उल्लंघने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातबाजीच्या दाव्यांशी आणि सेंद्रिय प्रमाणपत्राच्या अनधिकृत वापराशी संबंधित आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dubai Explosion: दुबईतील जेबेल अली औद्योगिक क्षेत्रात 20 मिनिटांत 7 भीषण स्फोट; धुराचे लोट पसरल्याने घबराट, 2 आरोपींना अटक

डाबरकडून लॅबल्स आणि जाहिरातींमध्ये सुधारणा सुरू

एफएसएसएआयच्या या कारवाईनंतर डाबर इंडियाने आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिले आहे. हे प्रकरण उत्पादनांची गुणवत्ता किंवा सुरक्षेशी संबंधित नसून केवळ पॅकेजिंगवरील शब्दांच्या अर्थाशी संबंधित आहे, असा दावा डाबरने केला आहे. तरीही, एक जबाबदार कंपनी म्हणून एफएसएसएआयने चिन्हांकित केलेले ‘१००%’ दावे आपल्या लेबल, जाहिराती आणि वेबसाइटवरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे डाबरने शेअर बाजाराला (BSE/NSE) कळवले आहे. गेल्या काही काळापासून एफएसएसएआय ग्राहकांच्या हितासाठी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर आळा घालण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहे. डाबरसारख्या बलाढ्य ब्रँडवर झालेली ही कारवाई इतर अन्न उत्पादकांसाठीही एक मोठा धडा मानली जात आहे.

Web Title: Fssai prohibits dabur food products misleading 100 percent claims marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Food Safety
  • FSSAI
  • India news

संबंधित बातम्या

Dabur Products Ban: डाबरच्या वस्तूंवर अचानक बंदी! तुपापासून मधापर्यंत… सरकारकडून विक्री रोखण्याचे निर्देश; काय घडलं?
1

Dabur Products Ban: डाबरच्या वस्तूंवर अचानक बंदी! तुपापासून मधापर्यंत… सरकारकडून विक्री रोखण्याचे निर्देश; काय घडलं?

मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी! Old Monk, Bagpiper, Royal Challenge सह काही लोकप्रिय ब्रँड्सवर विक्रीबंदी; काय आहे यामागचं कारण?
2

मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी! Old Monk, Bagpiper, Royal Challenge सह काही लोकप्रिय ब्रँड्सवर विक्रीबंदी; काय आहे यामागचं कारण?

Liquor Ban: दारु मिळणारच नाही… Old Monk सह ‘या’ ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी! प्रशासनाने अचानक का घेतला निर्णय?
3

Liquor Ban: दारु मिळणारच नाही… Old Monk सह ‘या’ ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी! प्रशासनाने अचानक का घेतला निर्णय?

भारताचा अपूर्ण नकाशा दाखवणे पडले महागात; लव्हलिनाच्या आक्षेपानंतर ग्लासगोतील रेस्टॉरंटचा यू-टर्न
4

भारताचा अपूर्ण नकाशा दाखवणे पडले महागात; लव्हलिनाच्या आक्षेपानंतर ग्लासगोतील रेस्टॉरंटचा यू-टर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.