थंडीच्या दिवसांमध्ये 'हे' पदार्थ लवकर होतात खराब, खाण्याआधी घ्या योग्य ती खबरदारी
पालेभाज्या खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. पण मेथी, पालक, कोथिंबीर आणि शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये ओलावा तसाच राहिल्यास भाज्या खराब होऊन जातात. त्यामुळे भाज्या साफ केल्यानंतर पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्यात.
थंडीच्या दिवसांमध्ये दूध जास्त काळ बाहेर राहिल्यास लवकर खराब होऊन जाते. दही, पनीर आणि मलईसारखे पदार्थ झाकण ठेवून किंवा डब्यात भरून ठेवावेत.
शिल्लक राहिलेला भात किंवा चपाती फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. खोलीच्या तापमानावर ठेवल्यानंतर त्यात जिवाणू वाढतात आणि तेच अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला आजारांची लागण होते.
सफरचंद, पपई, कलिंगड किंवा इतर फळे कापून उघडी ठेवू नयेत. कापून ठेवलेली फळे लवकर काळी पडतात आणि खराब होऊन जातात. कापलेली फळे झाकणाच्या डब्यात भरून ठेवावीत.
ओल्या खोबऱ्याचा किस बाहेर ठेवल्यास लगेच खराब होऊन जातो. त्यामुळे स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये भरून ठेवावा.